33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराणें पुत्रांच्या अडचणी काही कमी होईना,तिथे नवाब मालिकांचा राजीनामा स्वीकारला जाईना

राणें पुत्रांच्या अडचणी काही कमी होईना,तिथे नवाब मालिकांचा राजीनामा स्वीकारला जाईना

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रावादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य संदर्भात निलेश राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये १२ मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जाणीवपूर्वक समाजामध्ये द्वेषाच्या भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने भाष्य करुन समाजात दंगल घडविण्याचा कट रचत असल्याबाबत आणि शरद पवार साहेबांचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडून त्यांच्या जिवाला धोका निर्माण केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात यावी.

तक्रारीत त्यांनी म्हटलं, शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाग असणाऱ्या महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार आहे. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने दाऊद इब्राहिम संबंधित गुन्ह्याच्या तपासात अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून नवाब मलिकांविरोधात अद्यापही काहीही ठोस पुरावा मिळाला नाहीये.

काय आहे राणे बंधूंची प्रतिक्रिया ?

आम्ही हिंदूची बाजू घेतली आहे, तसेच चुकीचं काही बोलेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, सकाळी आमच्या विरोधात तक्रार झाल्याचे समजले आहे. योग्यवेळ आल्यावर त्यावर बोलेन असं नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. तसेच महाविकास आघाडीसरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्याचबरोबर आम्ही काहीही चुकीचं बोललेलो नाही अनिल देशमुख . हिंदु असल्याने त्यांचा राजीनामा घेतला मग नवाब मलिक मुस्लिम असल्याने त्याचा राजीनामा घेतला नाही का ? असा सवाल आम्ही उपस्थित केला. आम्ही हिंदू मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, तसेच दोन्ही समाजात तेढ निर्माण व्हावं अशी आमची इच्छा देखील नाही.योग्य वेळी आम्ही योग्य उत्तर देऊ असं नितेश राणेंनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी