29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजीनगरात काळया धंद्यांना सोन्याचे दिवस; अवैध धंद्यांशी संबंधितांवर गृहमंत्री फडणवीस ...

संभाजीनगरात काळया धंद्यांना सोन्याचे दिवस; अवैध धंद्यांशी संबंधितांवर गृहमंत्री फडणवीस कारवाई कधी करणार ? जनतेचा थेट सवाल

‘पार्टी विथ डिफरन्स’ असे ब्रीद मिरवणाऱ्या भाजपाचे तरुण तडफदार नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. ‘विरोधकांनी कितीही आरोप केले तरी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली नाही.’ असे प्रतिपादन फडणवीस यांनी विधानसभेत केले. पण, छत्रपती संभाजीनगर शहर व वाळूज औद्योगिक परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे स्थानिक पोलीस व गृहविभागाचे हेतुत: दुर्लक्ष होत आहे. ही बाब लपून राहिलेली नाही. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात पुराव्यासह हल्लाबोल केला होता. आधीच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात तथ्य नाही. पुन्हा यादीतील पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर व संवाद तपासू असे उत्तर उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले होते. माहिती अधिकारात वाळूज भागातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी अपील केल्यानंतर पोलीस उपायुक्तांनीही कारवाईचे आदेशही दिले. सभागृहात झालेली चर्चा, पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष यामागील कारण अनाकलनीय आहे. एका भाजप पदाधिकाऱ्यांचा या अवैध धंद्यांशी संबंध असल्याचे दानवे यांनी सभागृहात पुराव्यासह सांगितले होते. तरीही राज्याचे कर्तव्यनिष्ठ गृहमंत्री कारवाई करण्याकडे का कानाडोळा करतात, असा थेट सवाल या भागातील जनता करू लागली आहे.

औरंगाबाद शहर, औद्योगिक परिसरात अवैध लॉटरी, नावाखाली जुगार, रस्त्यावर सहज उपलब्ध होणारी दारू व इतर अमली पदार्थ, वाळूच्या तस्करीतील जीवघेणी स्पर्धा, नशेकडे वळून गुन्हेगार बनणारी तरुण पिढी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे असुरक्षित जीवन याकडे लक्ष वेधून कारवाईच्या मागणीसाठी अंबादास दानवे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. लेखी उत्तराने समाधान न झाल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले होते. यातील एका पोलीस अधिकाऱ्याचे नावही त्यांनी जाहीरपणे सभागृहात सांगितले. आधीच्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही असे गृहमंत्री फडणवीस यांनी उत्तरात सभागृहात दिलेली पोलीस अधिकाऱ्यांची यादी द्यावी.‌ त्यांचे नंबर व संभाषण तपासून कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. तर माहिती अधिकार कार्यकर्ते व मराठवाडा लॉटरी विक्रेता चालक असोसिएशनचे अध्यक्ष गणेश म्हैसमाळे अवैध धंद्यांवर कारवाईसाठी तक्रार व माहितीचा अधिकार वापरून पोलीस ठाणे व आयुक्तालयात खेट्या मारीत आहेत. पोलीस उपायुक्त व अपिलीय अधिकारी अपर्णा गीते यांनी 26 जुलै रोजी कारवाई करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे पथक नियुक्त करून प्रभावी कारवाई करावी, अपील करता व माहिती अपिलीय अधिकारी यांना कारवाईबाबत अवगत करावे असेही आदेशात म्हटले आहे.

अवैध लॉटरीत भाजप पदाधिकारी
सभागृहात दानवे यांनी एका पदाधिकाऱ्याचे नाव घेऊन सांगितले की, त्याचा या अवैध धंद्यात सहभाग आहे. भाजप कार्यालय असलेल्या इमारतीत अवैध लॉटरीचे केंद्र आहे. गृहमंत्री म्हणतात चौकशी करू. पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाकडेही दुर्लक्ष होत आहे. करोडो रुपयांच्या या घोटाळ्यामागे कोणती शक्ती आहे, याचा खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. असा सुर आता कानावर येत आहे.

तातडीच्या कारवाईची मागणी
मी स्वतः लॉटरी विक्रेता व चालक असोसिएशनचा संस्थापक अध्यक्ष आहे. सचोटीने व्यवसाय करणाऱ्या लॉटरी चालकांच्या विविध समस्यांचाही मी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या अवैध लॉटरी व गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराकडे पोलीस, प्रशासन यांचे लक्ष वेधले आहे. यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होत आहे, त्यामुळे तातडीने चौकशी करून कारवाई करावी.‌ अशी मागणी मराठवाडा लॉटरी विक्रेता व चालक असोसिएशनचे अध्यक्ष
गणेश म्हैसमाळे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
राहूल गांधी यांनी फ्लाइंग किस देताना मी पाहिले नाही; भाजपच्या खासदार हेमा मालिनी
एकनाथ शिंदे यांच्या माजी खासगी सचिवाला यूएलसीआर घोटाळाप्रकरणी ईडीकडून समन्स
महात्मा फुले अभ्यासक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अवैध धंद्यांचा दानवे यांनी केली पोलखोल
विधीमंडळात या विषयावर बोलताना विरोधी पक्ष नेते दानवे यांनी काळ्या धंद्यांची पोलखोल केली. पोलिसांना किती पैसे मिळतात याची सविस्तर जंत्री त्यांनी सादर केली. ती ‘लय भारी’च्या वाचकांसाठी..
0 गुटखा 2 लाख 40 हजार रुपये
0  गावठी दारू 31 लाख 40 हजार
0  गावठी दारू 9 लाख 80 हजार
0  मटका 12 लाख रुपये, जुगार 3 लाख रुपये
0  वाईन शॉप 2 लाख 60 हजार रुपये
0  मुरूम तस्कर 4 लाख रुपये
0  रेती कनेक्शन 16 लाख 75 हजार
0  लॉजिंग 1 लाख
0  गॅस रिफलिंग 1 लाख 50 हजार
0  एनडीपीएस 90 हजार

-देवेंद्र इनामदार, पुणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी