33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीनाथर मुंडे यांचा स्मृतिदिन 'संघर्षदिन सन्मान' म्हणून साजरा करण्यात आला

गोपीनाथर मुंडे यांचा स्मृतिदिन ‘संघर्षदिन सन्मान’ म्हणून साजरा करण्यात आला

टीम लय भारी

परळी : गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे गोपीनाथ गडावर उपस्थित होते. हा स्मृती दिन “संघर्षदिन सन्मान” म्हणुन साजरा केला जाणार असुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. (Gopinath Munde Memorial Day was celebrated)

लोकनेत्याला (Gopinath Munde) अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय येणार आहे. मुंडे प्रेमींच्या व्यवस्थेसाठी भव्य दिव्य मंडपाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली.

आज ३ जुन रोजी गोपीनाथ (Gopinath Munde) गडावर सकाळी १० ते १२:३० या वेळेत रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद तर दुपारी ३:30 वाजता “संघर्ष सन्मान दिन” कार्यक्रम होणार आहे. यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर व इतर मान्यवरांचा गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा :- 

I believe in making best of available opportunities, says Pankaja

दिवाळीत म्हाडाच्या तीन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार : जितेंद्र आव्हाड

धनंजय मुंडेंची काकांसाठी भावनिक पोस्ट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी