26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक मनपाच्या पुष्पोत्सवाला सव्वा लाख नाशिककरांनी दिली भेट

नाशिक मनपाच्या पुष्पोत्सवाला सव्वा लाख नाशिककरांनी दिली भेट

नाशिक महापालिकेच्या वतीने 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान मुख्यालयात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला यंदा उत्तम असा प्रतिसाद मिळाला असून तीन दिवसात सुमारे सव्वा लाख नाशिककरांनी पुष्पोत्सवाला भेट दिली. त्याच प्रमाणे यंदा 1700 पेक्षा जास्त नागरिकांनी पुष्प रचना व स्पर्धेत भाग घेतला होते. तर सुमारे 1300 नागरिकांनी भेट दिल्यानंतर मनपाच्या अधिकृत डायरीत आपले अभीप्राय नोंदवीले. उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांच्या नेतृत्वाखाली यंदा पुष्पोत्सवाचे चोख नियोजन करण्यात आले होते. तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांसह शेकडो जातीच्या फुलांनी मनपा मुख्याललयाचा सजविण्यात आले होते. तर कविसंमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

त्याच 75 कवींनी कविता सादर केल्या होत्या. त्यालाही रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मनपा मुख्यालयाच्या तीनही मजल्यांवर गर्दी होती. प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली फुलांची आकर्षक कमान व प्रांगणातील सेल्फी पॉइंट नाशिककरांचे खास आकर्षण ठरले. तर मिनीएचर लँडस्केपिंग व वेगवेगळ्या जातीच्या फुलांची कार्यालयाच्या तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या विविध गटांमध्ये गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मनपाच्या बजटमध्ये पुष्पोत्सवासाठी 50 लाख रुपयांची तरतूद होती, मात्र अधिक्षक विवेक भदाणे यांनी चोख नियोजन केल्याने यंदा सुमारे 23 लाख रुपयांची मनपाची बचत झाल्याचे कळते. सुमारे 27 लाखांमध्ये पुष्पोत्सव झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. त्यातही मागील वर्षी पेक्षा जास्त प्रतिसाद यंदा लाभला हे विशेष.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी