28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात पारा वाढला; पुढील 48 तासांसाठी मुंबईसह 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट जारी!

महाराष्ट्रात पारा वाढला; पुढील 48 तासांसाठी मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी!

संपूर्ण भारतात हिवाळा सध्या अंतिम टप्प्यात आहे. मुंबईत, मात्र उन्हाळ्याने ऋतू संपण्याआधीच हजेरी लावल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुख्यतः महाराष्ट्राने 2023चा आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस पाहिला आहे. काल म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा किनारपट्टीवर अनेक भागांमध्ये कमाल तापमान 37-39°C च्या तापमानची नोंद करण्यात आली. दरम्यान हवामान खात्याने पुढील 48 तासांसाठी अतिउष्णतेचा इशारा दिलाय. पुढील दोन दिवसात कोकण किनारपट्टी आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. या काळात तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. (Heat Waves in Maharashtra)

भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला 48 तासांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्ट असलेल्या या भागात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, शक्य असल्यास सकाळी 11 ते 2 दरम्यान बाहेर जाणे टाळावे. तसेच नागरिकांनी सोबत पाण्याची बाटली ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, राज्यात तापमानात झालेल्या कमालीच्या वाढीमुळे गव्हाच्या पिकाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा जास्त प्रभाव असणार आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी मुंबई, रायगड रत्नागिरी या जिलह्यांसाठी इशारा दिला आहे. तर मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यासाठी इशारा देण्यात आला आहे. यंदा उन्हाळा लवकर आल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन, हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे.

उन्हाचा त्रास जाणवल्यास काय कराल?

  • नाकातून रक्त आल्यास डोक्यावर पाणी मारावे.
  • ज्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो, अशा व्यक्तींनी अंघोळ झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटे ओल्या अंगानेच रहावे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
  • रात्री झोपताना उजव्या कुशीवर झोपावे. चंद्रनाडी चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो.
    तेलकट, मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावे.
  • उष्णतेमुळे तोंड आल्यास कच्ची तोंडली खावी. तसंच साजूक तूप लावावे आणि सर्वात महत्त्वाचं पोट स्वच्छ ठेवावं.
    लघवीला जळजळ होत असल्याचं सब्जा घातलेलं पाणी प्यावं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी