33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : संजय राऊतांविरोधातील ईडीच्या प्रयत्नांना पून्हा खीळ; सुनावणी घेण्यास...

Sanjay Raut : संजय राऊतांविरोधातील ईडीच्या प्रयत्नांना पून्हा खीळ; सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगत जामीन मंजूर केला होता. या जामीनाला आव्हान देत ईडीने मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला असून ईडीला पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे.

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. जवळपास 102 दिवस ते तुरुंगात होते. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी पीएमएलए न्यायालयात झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी देखील उच्च न्यायालयाने ईडीला फटकारत तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुन्हा ईडी खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी (25 नोव्हेंबर) उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे ईडीला आता संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार आहेत.
हे सुद्धा वाचा :
Sanjay Raut : संजय राऊतांविरोधातील ईडीच्या प्रयत्नांना पून्हा खीळ; सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

Baba Ramdev : ‘महिलांनी काही घातले नाही तरी त्या चांगल्या दिसतात’

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

संजय राऊत यांना 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना जामीन दिला होता. यावेळी विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक बेकादेशीर ठरवली होती. यावेळी कोर्टाने ईडीला खडे बोल सुनावत जे आरोपी आहेत त्यांना मोकाट सोडले आणि संजय राऊत यांनी कोणतेही सबळ पुरावे नसताना अटक केली असे म्हणत जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याच दिवशी संजय राऊत तुरूंगाबाहेर आले. आज झालेल्या सुनावणीत देखील उच्च न्यायालयाने जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे संजय राऊत यांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी