33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रिकेटInd vs NZ : 307 धावांचा डोंगर रचला; पण या क्षणाला सामना...

Ind vs NZ : 307 धावांचा डोंगर रचला; पण या क्षणाला सामना गमावला

भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला. भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावाचे लक्ष्य ठेवून देखील न्यूझीलंडने 47.1 षटकातंच केवळ 3 विकेट्स गमावून सामना जिंकला. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन (72 धावा) शुभमन गिल (50 धावा) आणि श्रेयस अय्यर (80 धावा) यांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 50 षटकांमध्ये 7 विकेट आणि 307 धावा केल्या मात्र तरी देखील भारतीय संघाला विजयाला गवसणी घालता आली नाही.
या सामन्यासाठी नाणेफेक जिकंत न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाच्या सलामीचे फलंदाज शुभमन गिलसह कर्णधार शिखर धवन उत्कृष्ट कामगिरी केली. दोघांनी शतकी भागिदारी पूर्ण करताच 50 धावांवर शुभमन गिल बाद झाला. ज्यानंतर काही वेळातच शिखर धवनची देखील 72 धावांवर विकेट गेली. त्यानंतर भारतीय फलंदाज मैदानावर टिकाव धरू शकले नाहीत. पंत 15 सूर्यकुमार 4 धावा करुन बाद झाला. 36 धावा करुन संजूही बाद झाला. श्रेयसने 76 चेंडूत 80 धावांची खेळी करत भारतीय संघाचा स्कोर 300 पार नेला. न्यूझीलंडकडून लॉकी आणि साऊदी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले असून मिल्ने याने एक विकेट घेतली.

या सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली होती मात्र तरी देखील भारताचा या सामन्यात पराभव झाला. 39 व्या षटकानंतर न्यूझीलंडचे पारडे जड होऊ लागले. यावेळी न्यूझीलंडला प्रत्येक षटकामागे 9 धावांची गरज होती. मात्र अशा परिस्थितीतच भारताची कामगिरी खालावली शार्दुल ठाकुर गोलंदाजी करण्यास आला आणि सामन्याचे चित्रच पालटले, या एकाच षटकात चार चौकार आणि 1 षटकारासह न्यूझीलंडने 25 धावा केल्या. त्यामुळे सामना न्यूझीलंडच्या हातात आला आणि त्यांनी दमदार विजय मिळवला.

हे सुद्धा वाचा :

Sanjay Raut : संजय राऊतांविरोधातील ईडीच्या प्रयत्नांना पून्हा खीळ; सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

taxation : कर आकारणीच्या नियमांमध्ये होणार महत्त्वाचा बदल; सरकार करणार लवकरच घोषणा

taxation : कर आकारणीच्या नियमांमध्ये होणार महत्त्वाचा बदल; सरकार करणार लवकरच घोषणा

या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार शिखर धवन म्हणाला, आम्ही चांगली धावसंख्या उभारली, पहिल्या 10-15 षटकांमध्ये आम्हाला खेळपट्टीची मदतही मिळाली. विशेषत: 40 व्या षटकानंतर खेळाची दिशाच बदलली. आम्ही इथे खेळण्याचा आनंद लुटला आणि सामना जिंकला असता तर हा आनंद द्विगुणित झाला असता. आम्हाला आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी