30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमहाराष्ट्रManisha Kayande: आम्ही केलं तर पाप, तुम्ही केलं तर पुण्य!

Manisha Kayande: आम्ही केलं तर पाप, तुम्ही केलं तर पुण्य!

युवासेनाप्रमुख आणि वरळी विधान सभा क्षेत्राचे आमदार आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात भेट झाली आहे. या दोन्ही राजकीय वारसा असलेल्या आणि नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली.

युवासेनाप्रमुख आणि वरळी विधान सभा क्षेत्राचे आमदार आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात भेट झाली आहे. या दोन्ही राजकीय वारसा असलेल्या आणि नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली. यावर शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या की, ठाकरे गटाची परंपरा आदित्य ठाकरे पुढे चालवत आहेत. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातील तेजस्वी यादव हे त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. हे दोन तरुण नेतृत्व देशाच्या संविधान वाचवा तसेच तरुणांचे प्रश्न, बेरोजगारीच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक समस्येवर बोलत आहेत. असे तरुण नेतृत्व एकत्र आले कि देशाला एक चांगली दिशा मिळेल. एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल.
दरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्ष यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये त्यांनी भाजप वर निशाणा साधत तुम्ही मराठी दांडिया करता तसेच छट पूजा करता तुम्ही उत्तर भारतीय दिवस साजरे करता असे बोल्त त्यांच्यावर टीकास्त्र सोडले ‘आम्ही केलं तर पाप आणि तुम्ही केलं तर पुण्य हा भारतीय जनता पक्षाचा नेहमीचा प्रकार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!