30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरराजकीयशरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचे केले कौतुक !

शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचे केले कौतुक !

शरद पवार म्हणाले जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेले सर्व आरोप खोटे, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेले आरोपांबद्दल एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांवर लावलेले सर्व गुन्हे हे खोटे आहेत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे स्पष्ट करतानाच त्यांनी ताकदीचा वापर करून असे कोणतेही आरोप राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लावू नये, असा इशारा देखील दिला.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एकाच महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. हर हर महादेव चित्रपटावरून झालेला वाद आणि प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी त्यांना चित्रपट वादाप्रकरणी अटक देखील करण्यात आली होती. जामीनावर बाहेर आल्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनयभंगाच्या या आरोपामुळे आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका सुद्धा घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अनेक ठिकाणी निषेध आंदोलनही केले. तसेच राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी पुढे येत आव्हाडांवर लावलेल्या या आरोपांचा निषेध करत कारवाई मागे घेण्याची मागणी करत आम्ही आव्हाड यांच्या सोबत आहोत असेही सांगितले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!