28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रइंडिया आघाडी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राजाभाऊ वाजेंना निवडून आणण्याचा निर्धार

इंडिया आघाडी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राजाभाऊ वाजेंना निवडून आणण्याचा निर्धार

नाशिक लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार इंदिरानगर येथील हाॕटेल सयाजी पॕलेस येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीस शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी शरद पवार गट, इंदिरा काँग्रेस,सीपीएम,आम आदमी पार्टीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे,संपर्कप्रमुख जयंत दिंडे,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर,महानगरप्रमुख विलास शिंदे,राष्ट्रवादीशरद पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,श्रीराम शेटे,इंदिरा काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड,माजी मंत्री शोभाताई बच्छाव, हेमलता पाटील, माजी आमदार नितीन भोसले, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते,भगिरथ शिंदे आदींनी आपले मनोगत व्याक्त केले.(India Alliance office-bearers meet resolve to elect Rajabhau vaje)

वाजे यांच्या विजयासाठी शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा राबविण्याचा मनोदयही सर्वांनी यावेळी बोलवून दाखवला.महायुती एकवाक्यता नसल्याने त्यांचा उमेदवार अजून ठरत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्या विद्यमान खासदाराला तर तिकिटासाठी वणवण भटकावे याला काय म्हणावे.महायुतीत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीचा लाभ उठवून आपणास लोकांना इंडिया आघाडीची विचारधारा पटवून द्यावी लागेल आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे,असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मनोगत सांगितले.मोदी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षात महागाईने कळस गाठला.घरगुती गॅस आणि इंधनाचे दर गगनाला भिडले.

बेरोजगारी वाढली,शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.सरकार विरुद्ध आवाज उठविणाऱ्याचा आवाज दाबण्यासाठी ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचा सर्रास वापर करून मोदी सरकार हुकूमशाहीचे दर्शन घडवित आहे या सरकारला खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देणे ही काळजी गरज आहे,असे इंदिरा काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.आकाश छाजेड आणि माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांनी आपल्या भाषणात सांगितले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,श्रीराम शेटे आणि नितीन भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाजे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. उमेदवार राजाभाऊ वाजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.शिवसेना ठाकरे गट आणि इंडिया आघाडीने आपल्यावर जो विश्वास व्यक्त केला त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही. सर्वांचा विकास हाच आपल्या ध्यास असून निवडून आल्यानंतर संसदेत नाशिक जिल्ह्याचा आवाज मी निश्चितपणे बुलंद करणार असे अभिवचनही वाजे यांनी यावेळी दिले.उमेदवार राजाभाऊ वाजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केलेप्रास्ताविक शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे तर आभारप्रदर्शन डी.जी.सुर्यवंशी यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी