31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्रसरकारकडून राज्याचा अपमान : संजय राऊत

केंद्रसरकारकडून राज्याचा अपमान : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राज्यातील रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच कोरोना लसीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रवर कोरोनासारखे एवढे मोठे संकट असताना केंद्र सरकार प्रशासनला हाताशी घेऊन भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील विरोधी पक्षाने याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे. परंतु, त्यांना केंद्र सरकारची ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार उरणार नाही, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली. भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या राज्यांमध्ये कोरोना पळालेला आहे. तर सरकार नसलेल्या राज्यांमध्ये कोरोना आहे, अशाप्रकारे केंद्र सरकार वागत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब ही राज्ये कोरोना हाताळणीत अपयशी ठरली असे केंद्र सरकारेच म्हणणे आहे. परंतु, हे त्या राज्यांचे नव्हे तर मोदी सरकारचे अपयश आहे. कारण, ही राज्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत होती. त्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नसेल तर हे त्या राज्यांचे नव्हे तर केंद्र सरकारचे अपयश आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

लॉकडाऊन केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्या भाजप नेत्यांना संजय राऊत यांनी फैलावर घेतले. हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर त्यांना करु द्यावे. पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाची काळजी आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार अपयशी झाल्याचे म्हणायचे आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्यासंदर्भातील निर्णय घेऊ देत नाही. हे काय चालले आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला हवे. असे आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी ‘प्राण जाये पर वचन ना जाये’, अशा पद्धतीने करोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी