29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकचराकुंडीवर आमच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही : जितेंद्र आव्हाड

कचराकुंडीवर आमच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही : जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी

मुंबई: भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानाचे जगभर पडसाद उमटायला सुरुवात झाली असून अनेक मुस्लीम देशांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे. अनेक मुस्लीम देशांनी भारातीय मालावर बहिष्कार घातला आहे. Jitendra Awhad on narendra modi

अरब देशातील कचराकुंड्यांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे देशातील राजकीय पक्षांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी यावर भाष्य केले आहे. Jitendra Awhad on narendra modi

त्यांनी ट्विट करत म्हटले की, अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहेत. आम्ही मोदी आणि भाजपला या देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच पण आमचा मोदी विरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही या कृतीचा आम्ही निषेध करतो.

भाजपाच्या प्रवक्त्याने पैगंबरांबद्दल जे काही लिहीले होते, ते अगदीच चुकीचे होते. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणे हे चुकीचेच आहे. जे कोणी असे विद्वेषाचे प्रयोग करीत असतात त्यांना कडक शासन झालेच पाहीजे. तरच समाजात सलोखा राखला जाईल.

जातीय धार्मिक विद्वेष पसरवून आपण देशाचे नुकसान करीत आहोत. याची जाणीव प्रत्येकानेच ठेवली पाहीजे. आज अरब लोकांनी पाऊल उचलले आहे. कारण आपल्या देशातील मुस्लिम द्वेष वाढतोय. उद्या ख्रिश्चन द्वेष वाढला म्हणून अमेरीकेने हे पाऊल उचलले तर काय होईल. देशाचे हित कश्यात आहे हे ध्यानात घ्यावे. Jitendra Awhad on narendra modi

 हे सुद्धा वाचा:

पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी : जयंत पाटील

J&K: BSF troops fire rounds upon hearing a humming sound in Akhnoor; 3 drone-dropped magnetic IEDs recovered

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी