29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रचोरटयांनी चोरले चक्क शाळेतील टीव्ही

चोरटयांनी चोरले चक्क शाळेतील टीव्ही

टीम लय भारी

कराड : कराड येथील शेरे जिल्हा परिषद शाळेतून चोरटयांनी चक्क टीव्हींची चोरी केली आहे. शाळेतील एकूण ६ एलईडी टीव्हींची चोरी करण्यात आली आहे. एलईडी टीव्हीं चोरणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली असून 2 टीव्ही जप्त करण्यात आले (Karad zilla Parishad School face an incident, thieves stole  LED TVs).

संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. ऋतुराज संजय निकम (वय 20), अजिंक्य संजय गावडे (वय 19), रोहित अरुण सावंत (वय 19), धनराज बाबुराव मोटे (वय 25, सर्व रा. शेरे, ता. कराड) व आकाश प्रभाकर शेळके (वय 21, रा. कार्वे, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ का बोलले जाते, जाणून घ्या

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शेरे येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीने जानेवारी 2020 मध्ये सहा एलईडी टीव्ही दिले होते होते. दरम्यानच्या कालावधीत शाळा बंद असताना संशयितांनी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये लावलेले टीव्ही चोरट्यांनी चोरून नेले. चोरलेल्या टीव्हीची कार्वे येथे दोन, तुळसण येथे एक, जत येथे एक अशी विक्री केली. तीन ऑगस्ट 2021 रोजी ही बाब लक्षात आल्यानंतर शाळेचे शिक्षक प्रकाश फल्ले यांनी याबाबतची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.

संजय राऊत सातत्याने माझ्यावर टीका करून मला प्रसिद्धी मिळवून देतात : चंद्रकांत पाटील

Maharashtra: BJP leader Kirit Somaiya detained at Karad railway station

या तक्रारीवरून तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेरे येथील चार व कार्वे येथील एकाला अटक केली. त्यांना सोमवार दि. 20 रोजी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार, शशिकांत घाडगे, सचिन निकम तसेच धनंजय कोळी यांनी ही कारवाई केली. अधिक तपास मिलींद बैले करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी