28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रlokasbha 2024;महाराष्ट्रात महाविकास ठरविणार ; महायुतीला 30 च्या आत रोखणार

lokasbha 2024;महाराष्ट्रात महाविकास ठरविणार ; महायुतीला 30 च्या आत रोखणार

राष्ट्रवादी शिवसेनेचे आमदार यांना विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढायची आहे. महायुतीचा लोकसभेचा उमेदवाराला निवडणूक विजय करताना विधानसभेला आपल्याला कोण पाठिंबा देणार यावर सगळी गणित अवलंबून राहणार आहेत.

महाराष्ट्रात महाविकास ठरविणार ;
महायुतीला 30 च्या आत रोखणार

प्रशांत चुयेकर

(lokasabha 2024) लोकसभा निवडणूक दमोर ठेवून भाजपने आश्वासन दाखवून एकनाथ शिंदे (akhanath shinde) यांच्या शिवसेनेला व अजित पवार(Ajit pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षाला, सत्तेत आणून ईडी(ed) पासून दूर नेत सरकार स्थापन केले  तरी त्यांची नाराजी दूर करण्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश येत आहे. राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेचे ‘नेते’ विधानसभेचा शब्द मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मदत करायची का या संभ्रमात आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे आमदार यांना विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढायची आहे. महायुतीचा लोकसभेचा उमेदवाराला निवडणूक विजय करताना विधानसभेला आपल्याला कोण पाठिंबा देणार यावर सगळी गणित अवलंबून राहणार आहेत.

असे आहेत बंडखोर
विजय शिवतारे (vijay shivatare)
शिवसेनेच्या विजय शिवतारे यांच्यासारख्या उमेदवारांनी तर उघड उघड बंडच करायला सुरुवात केली आहे. सुमित्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असे निश्चित मानले जाते.

आमदार निलेश लंके (nilesh lanke)
लोकसभेचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सुद्धा अध्यक्ष शरद पवार यांना जाऊन भेटले.ती अहमदनगर मध्ये सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लढणार आहेत.पूर्ण काळात तरी उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याचे महाविकास आघाडीतून बोललं जातं.

वसंत मोरे (vasant more)
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पुणेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक यांनी सुद्धा पक्षाला राम राम ठोकला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पुणे लोकसभा मतदार संघाची तयारी दर्शवली आहे.यापूर्वीसुद्धा त्यांनी या मतदारसंघात तयारी दर्शवली होती मात्र त्याला संधी मिळाली नव्हती. प्रामाणिक काम करून सुद्धा आपल्यावर न्याय होत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कडून बोलले जाते.

 

छगन भूजबळ यांनी केली शिंदेवर टीका
नाशिक लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांची उमेदवारी कशी घोषित केली यावरुण वाद झाला. महायुतीच्या 28 जागावरून वाद सुरू आहे.

बंडखोरी अजून वाढणार
ईडीला नाही घाबरणार

महायुतीत इच्छुक उमेदवारांना तिकीट नाही मिळाले तरलोकसभा निवडणुकीत बंडखोरी होणार हे मात्र नक्की आहे.शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार नाही याची जोरात चर्चा सुरू आहे.तिकीट न मिळालेल्या खासदारांनी जर बंडखोरी केली तर मात्र ते महायुतीला अवघड जाणार आहे. बंडखोर उमेदवारांचं महाविकास आघाडीत स्वागतच केले जाणार आहे. बंडखोरी करणार मात्र येळीला नाही घाबरणार अशीच अवस्था या उमेदवारांची सध्या तरी दिसत आहे.

सर्वे सुद्धा महायुतीच्या विरोधातच

सध्याच्या एबीपी (abp)  आणि सी व्होटर्सरच्या सर्वेनुसार महायुतीला फक्त 28 जागा मिळणार आहेत.तर महावीर कसा आघाडीला 20 लोकसभेच्या जागा मिळणार आहेत. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीला आता महायुतीला रोखण्यात   यश मिळत आहे. अजून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा बरेच पत्ते बाहेर काढले जाणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी