29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमहादेव जानकर दिल्लीच्या वाटेवर, डॉ. महात्मेंच्या जागेवर वर्णी लागणार

महादेव जानकर दिल्लीच्या वाटेवर, डॉ. महात्मेंच्या जागेवर वर्णी लागणार

टीम लय भारी
मुंबई : माजी मंत्री व आमदार महादेव जानकर यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे. त्यामुळे जानकर समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. ही नाराजी अंगलट येऊ शकते, याची जाणीव झाल्याने जानकर यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली ( Mahadev Jankar supporters reluctant on BJP ).

 

जानकर यांना राज्यसभेची खासदारकी दिली जाण्याची शक्यता आहे. डॉ. विकास महात्मे यांची जागा जानकर यांना दिली जाईल. डॉ. महात्मे यांचा खासदारकीचा कार्यकाळ पुढील दीडेक वर्षात संपणार आहे ( Mahadev Jankar will be replace at Dr. Vikas Mahatme’s post ).

गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवार घेणार भेट

Mahadev Jankar
महादेव जानकर

धनंजय मुंडेंची लोकप्रियता शिगेला, मातब्बर नेत्यांच्या पंक्तीत समावेश, पंकजा मुंडेंनाही टाकले मागे

डॉ. महात्मे हे लोकप्रिय नेते नाहीत. महात्मे यांनी धनगर समाजाच्या आंदोलनात नेहमी हिरिरीने भाग घेतला. नेतृत्वही केले. परंतु जानकर यांच्याएवढी डॉ. महात्मे यांची लोकप्रियता नाही ( Mahadev Jankar popular mote than Dr. Vikas Mahatme ). खासदारकी मिळाल्यानंतरही डॉ. महात्मे यांनी फार प्रभावी असे कार्य केलेले नाही. पक्षासाठी त्यांचा उपयोग झाला नाही.

डॉ. महात्मे यांनी खासदार होण्यापूर्वी धनगर समाजाची मोठी आंदोलने उभारली होती. पण खासदार झाल्यानंतर मात्र धनगर समाजातील त्यांचा प्रभाव पूर्णत: ओसरून गेला आहे.
महादेव जानकर यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. गोपीचंद पडळकर व महादेव जानकर हे दोन्ही नेते धनगर समाजात लोकप्रिय आहेत ( Mahadev Jankar and Gopichand Padalkar is popular in Dhangar). त्यांना समाजाचा मोठा पाठींबा आहे. त्या पार्श्वभूमीवर जानकर यांची नाराजी अडचणी ठरू शकते, असा भाजपच्या नेत्यांचा कयास आहे.

भाजपने जानकरांवर असा केला अन्याय
महादेव जानकर हे ‘राष्ट्रीय समाज पक्षा’चे संस्थापक व अध्यक्ष आहेत. सन २०१४ पासून त्यांची भाजपबरोबर युती आहे. सन २०१४ मध्ये जानकर यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. सुप्रिया सुळे यांचा त्यावेळी निसटता विजय झाला होता. जानकर यांच्यामुळे सुळे यांचा पराभव होतोय की काय असे मतमोजणीच्या वेळी चित्र दिसत होते. पण सुळे कशाबशा विजयी ठरल्या होत्या ( Mahadev Jankar contested election against Supriya Sule at baramati Constituency ).

जानकर यांच्या या लोकप्रियतेचा पुरेपुर फायदा भाजपने नंतर करून घेतला. जानकर यांच्यामुळे धनगर व बहुजन समाज भाजपबरोबर जोडला गेला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने जानकर यांच्या रासपला ५ जागा दिल्या. त्यापैकी राहूल कूल यांच्या रूपाने एका जागेवर विजय झाला ( MLA Rahul Kul was contested assembly election on RSP ticket ).

जानकर यांना भाजपने विधानपरिषदेचे आमदार बनविले. नंतर मंत्रीपद सुद्धा दिले. पण २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जानकर यांचा काटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला ( Devendra Fadnavis did injustice with Mahadev Jankar ).

जानकर यांच्या पक्षाचे आमदार असलेल्या राहूल कूल यांनाच फडणवीस यांना पळवले. कूल सध्या भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार आहेत ( Rahul Kul is BJP MLA ).
विधानसभा निवडणुकीत भाजपने जानकर यांच्या पक्षाला एक सुद्धा तिकीट दिले नाही. त्यामुळे जानकर यांनी काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवारांना निवडणुकीत उतरविले. त्यात रत्नाकर गुट्टे हे उमेदवार विजयी झाले.

गोपीचंद पडळकरांच्या भेटी गाठी, माता – भगिनींनी केले स्वागत !

Pankaja munde could become chief minister..

आरक्षणाच्या मुद्द्यावरून अगोदरच धनगर समाज भाजपवर संतापलेला आहे. त्यात जानकर यांना भाजपने फसविले. त्यामुळे धनगरांच्या संतापात आणखी भर पडली. ‘भाजपने जानकर यांचा वापर करून नंतर त्यांना फेकून दिल्याची’ प्रबळ भावना धनगर समाजामध्ये आहे.

गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी
धनगर समाजाची ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपने विधानपरिषदेचे आमदार बनविले. जानकर यांना आणखी बाजूला सारण्यासाठीच हा प्रकार असल्याची भावना धनगर समाजामध्ये प्रबळ झाली. धनगर समाजाचे नेते राम शिंदे, गणेश हाके यांनाही भाजपने डावलल्याची भावना आहेच.
भाजपसमोर ‘महाविकास आघाडी’चे मोठे आव्हान
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांनी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली आहे. या तिन्ही पक्षांना सत्तेबाहेर ठेवायचे असेल तर भाजपला अनेक घटकांना जवळ करावे लागणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भेट हे त्याचेच द्योतक आहे.

महादेव जानकरांची भाजपला गरज
गोपीचंद पडळकरांना आमदार बनविल्यामुळे धनगर समाजील एक वर्ग खूष झाला आहे. परंतु या समाजामध्ये ‘आरक्षणा’च्या मुद्द्यावरून अजूनही रोष आहे. अशा परिस्थितीत जानकर यांना खासदारकी दिल्यास धनगर समाजामध्ये भाजपविषयीचा राग कमी होईल. त्यामुळे जानकर यांना पुन्हा जवळ करून त्यांचे पुनवर्सन करण्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी