30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रLumpy Skin Disease: लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक जिल्हयाला १ कोटींची...

Lumpy Skin Disease: लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक जिल्हयाला १ कोटींची मदत जाहीर

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) नाही तर संपूर्ण देशभरात लम्पी नामक त्वचारोगाने (Lumpy Skin Disease) थैमान घातले आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत ४२ गाई आणि म्हशींचा लम्पीमुळे बळी गेला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कॅबिनेटची उच्चस्तरीय बैठक (Cabinet Meeting) घेऊन संबधित विभागाला दक्ष राहण्याचे आदेश दिले.

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) नाही तर संपूर्ण देशभरात लम्पी नामक त्वचारोगाने (Lumpy Skin Disease) थैमान घातले आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत ४२ गाई आणि म्हशींचा लम्पीमुळे बळी गेला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कॅबिनेटची उच्चस्तरीय बैठक (Cabinet Meeting) घेऊन संबधित विभागाला दक्ष राहण्याचे आदेश दिले. त्याशिवाय या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शिंदेंनी या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी रूपयांची (1 Crore compensation) मदत करण्याचे आश्वासन दिले जेणेकरून ज्या शेतकऱ्यांची जनावरे लम्पी त्वचारोगामुळे मृत्युमुखी पडली आहेत त्यांना काही अंशी मदत मिळू शकेल. सदर परिस्थितीमुळे, जनावरांची एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्‍हयात वाहतूक करण्यात सक्त मनाई करण्यात आली आहे. ही जनावरे वैदयकीयदृष्टया तंदरूस्‍त असतील तरच त्यांच्या वाहतूकीस सरकारी यंत्रणांकडून अनुमती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून पार पडलेल्या बैठकीबाबत एक पत्रक जारी करण्यात आले. त्यामध्ये असे नमूद केले होते की, सध्या लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यामध्ये झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण योजनेच्या (National Disaster Prevention Policy) अतंर्गत ज्या शेतकऱ्यांची जनावरे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पडली त्यांना आम्ही नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला आहे. हया योजनेची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयामध्ये एक समिती नेमण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात लम्पी त्वच्यारोगाची पहिली घटना जलगाव जिल्हयातील छिनावल नामक गावामध्ये निदर्शनास आली होती. लम्पी त्वचारोगचा प्रादुर्भाव मुख्यत्त्वेकरून गाई आणि म्हशींमध्ये दिसून येतो. लम्पी त्वचारोगाची लक्षणे नसलेल्या गाई किंवा म्हशीचे दूध प्यायल्याने मानवी शरीरास कोणताही धोका उद्भवत नाही असे तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा –

RTO forms special teams : छोटया अंतराचे भाडे नाकारण्याऱ्या टॅक्सी चालकांची आता खैर नाही !

Jayant Patil : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का, जयंत पाटलांचा कडवा सवाल

University : महाराष्ट्र आणि अमेरिकेतील विद्यापीठे एकत्र आणण्याचा सरकारचा प्रयत्न

लम्पी त्वचारोगामुळे महाराष्ट्रातील एकूण २८० गावे प्रभावित झाली आहे. त्यामध्ये मुख्यत्वेकरून जलगाव, अहमदनगर, अकोला, धुले, पुणे, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक आणि जालना या जिल्हयांचा समावेश होतो. शासकीय यंत्रणांकडून असे सांगण्यात येत आहे की जरी या रोगाचा प्रादर्भाव जनावरांमध्ये झपाटयाने होत असला तरी त्यामुळे मृत्यु होणाऱ्या जनावरांची संख्या तुलनेने फारच कमी आहे.

लम्पी रोगाची लागण झालेल्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारने राज्यात एकूण ११५९ पशूवैदयकीय कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये २८६ जागा राज्यस्तरावर आणि ८७३ जागा जिल्हा परिषद स्तरावर रिक्त आहेत.

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागने प्रत्येक राज्यातील संबंधित यत्रंणाना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनावरांचे जलद गतीने लसीकरण अभियान राबविण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने लम्पी त्वचारोग संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी १८००२३३०४१८ हा टोल-फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय राज्य स्तरावर जनावरांच्या संगोपनाचे मार्गदर्शन करण्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे.

संपूर्ण देशामध्ये थैमान घालणाऱ्या लम्पी नामक त्वचारोगावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, केंद्रातील सरकारी यंत्रणा सध्याच्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत आणि देशातील नावाजलेले पशुतज्ञ या रोगाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी परिणामकारक लस बनविण्याचे संशोधन करत आहेत.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी