33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
HomeमुंबईRTO forms special teams : छोटया अंतराचे भाडे नाकारण्याऱ्या टॅक्सी चालकांची आता...

RTO forms special teams : छोटया अंतराचे भाडे नाकारण्याऱ्या टॅक्सी चालकांची आता खैर नाही !

जर मुंबईतील (Mumbai) टॅक्सी चालक एखादया प्रवाश्याला छोटया अंतरावरील भाडे नाकारत असेल तर तो प्रवासी त्या टॅक्सी चालकाविरूद्ध (Taxi Driver) तक्रार थेट तारदेव येथील प्रादेशिक वाहतूक कार्यालयात नोंदवू शकतो. मुजोर टॅक्सी चालकांना जरब बसविण्यासाठी प्रादेशिक वाहतूक कार्यालयाने नुकतीच एक हॉटलाईन क्रमांक, व्हाट्सअप चॅट आणि ई-मेल द्वारे आपल्या तक्रारी नो्ंदविण्याची सुविधा प्रवाश्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधी ना कधीतरी एखादया टॅक्सी चालकाने किंवा रिक्शा चालकाने छोटया अंतरावरील भाडे नाकारल्याचा अनुभव नक्की आला असेल. परंतु आता प्रादेशिक वाहतूक कार्यालयाने (RTO) या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा काढला असल्याचे दिसून येत आहे. जर मुंबईतील (Mumbai) टॅक्सी चालक एखादया प्रवाश्याला छोटया अंतरावरील भाडे नाकारत असेल तर तो प्रवासी त्या टॅक्सी चालकाविरूद्ध (Taxi Driver) तक्रार थेट तारदेव येथील प्रादेशिक वाहतूक कार्यालयात नोंदवू शकतो. मुजोर टॅक्सी चालकांना जरब बसविण्यासाठी प्रादेशिक वाहतूक कार्यालयाने नुकतीच एक हॉटलाईन क्रमांक, व्हाट्सअप चॅट आणि ई-मेल द्वारे आपल्या तक्रारी नो्ंदविण्याची सुविधा प्रवाश्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. प्रादेशिक वाहतूक कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतीत असे सांगितले की, आम्ही टॅक्सी चालकांच्या आरेरावीवर नियंत्रण आणण्यासाठी तीन सदस्यीय पथकाची स्थापना केली आहे. हे पथक शहरातील‍ महत्त्वाच्या भागात फिरून ज्या ठिकाणी टॅक्सी चालक लहान पल्ल्याचे भाडे नाकारत आहे त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

प्रादेशिक वाहतूक कार्यालयाच्या वतीने असे सांगण्यात आले की, या प्रकरणात मागील दोन आठवडयाच्या कालावधीत त्यांनी एकूण १९ टॅक्सी चालकांवर कारवाई केली आहे. येत्या काळात हया भरारी पथकाची संख्या वाढवण्याचा प्रादेशिक वाहतूक कार्यालयाचा हेतु आहे जेणेकरून जास्तीत जास्त टॅक्सी चालकांवर कारवाई करणे शक्य होईल.

हे सुद्धा वाचा –

Sonali Phogat Death Case : सोनाली फोगाटच्या मृत्युचा तपास आता CBI करणार

Navneet Rana भांडकुदळ नवनीत राणांच्या विरोधात निवृत्त पोलीस संघटना मैदानात !

Maharashtra Politics : महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 1.54 कोटीचा प्रोजेक्ट गुजरातने पळवला!

प्रवाश्यांनी आपली तक्रार कुठे नोंदवावी –

ज्या प्रवांशाना टॅक्सी चालकांच्या आरेरावी करून किंवा उद्धटपणे भाडे नाकारण्याचा अनुभव आला असेल, त्यांनी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत ९०७६२०१०११०१ या क्रमांकावर संपर्क साधून ते आपली तक्रार नोंदवू शकतात. संध्याकाळी ७ नंतर ते त्याच क्रमांकावर व्हाट्सअप किंवा टेक्स्ट मैसेज द्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात. त्याशिवाय प्रवासी, प्रादेशिक वाहतूक कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या [email protected] या पत्त्यावर आपली तक्रार नोंदवू शकतात. प्रत्येक तक्रारीची दखल ‘इंस्पेक्टर’ रँकच्या अधिकाऱ्याकडून घेतली जाणार आहे.

त्याशिवाय, प्रवाश्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे सांगितले की, जे टॅक्सी चालक प्रवाश्यांना नाहक त्रास देतील आणि छोटया अंतरावरील भाडे स्वीकारण्यास टाळाटाळ करतील अशा टॅक्सी चालकांविरूद्ध आम्ही कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.‍

अधिकारी टॅक्सी चालकांशी संवादसुद्धा साधणार –

प्रादेशिक वाहतूक कार्यालयाचे पथक शहरातील टॅक्सी चालकांशी संवाद साधून त्यांना मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे महत्त्वाचे नियम संमजसपणे समजावून सांगतील आणि त्यांना प्रवाश्यांची उद्धटपणे न वागता त्यांना लहान पल्ल्याची भाडे स्वीकारण्याचे आवाहन करतील.

 

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी