33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रSolapur News : 'मिस यू....' असा स्टेटस ठेवून युवकाने केली आत्महत्या!

Solapur News : ‘मिस यू….’ असा स्टेटस ठेवून युवकाने केली आत्महत्या!

सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका तरुणाने व्हाट्सअॅप स्टेटस ठेवला आणि त्यानंतर जवळच्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अरुण मधूकर एडवे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सोलापुर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने व्हाट्सअॅपवर “मिस यू ऑल ऑफ यू” असा स्टेटस ठेऊन जीवन संपवल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सध्या तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाणे कमालीचे वाढत चालले आहे. बेरोजगारी, प्रेमप्रकरण, इगो अशा एक ना अनेक गोष्टी आत्महत्येला कारणीभूत ठरत असतात परंतु अशावेळी योग्य मार्गदर्शनाची गरज असते परंतु ते वेळेत पोहोचत नसल्याने अनेकजण नाहकपणे आपला जीव गमावून बसतात. असेच काहीसे सोलापुरातील एका तरुणासोबत झाले. या घटनेत केवळ त्या तरुणाने ठेवलेल्या व्हाट्सअॅप स्टेटसवरून या तरुणासोबत काहीतरी घडले असावे असा अंदाज आल्याने तात्काळ शोधाशोध सुरू झाली आणि सदर घटना उघडकीस आली आहे. तरुणाच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळालेले नाही.

हाती आलेल्या मााहितीनुसार, सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका तरुणाने व्हाट्सअॅप स्टेटस ठेवला आणि त्यानंतर जवळच्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अरुण मधूकर एडवे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 1 सप्टेंबर रोजी अरुणने त्याच्या व्हाट्सअॅप स्टेटसवर “मिस यू ऑल ऑफ यू” असा मेसेज ठेवला. जेव्हा अरुणच्या मित्रांनी हा मेसेज पाहिला तेव्हा त्यांचे धाबे दणाणले, लगेचच त्यांनी त्याच्या कुटुंबियांना कळविले आणि त्यानंतर अरुण गायब असल्याचे लक्षात येताच शोधाशोध सुरू झाली.

हे सुद्धा वाचा…

Jayant Patil : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का, जयंत पाटलांचा कडवा सवाल

University : महाराष्ट्र आणि अमेरिकेतील विद्यापीठे एकत्र आणण्याचा सरकारचा प्रयत्न

Raju Shetti : राजू शेट्टी यांनी दंड थोपटले

बरीच शोधाशोध करून सुद्धा अरुणचा शोध काही लागला नाही त्यामुळे अरुणच्या मित्रांनी त्यांच्या व्हाट्सअॅप स्टेटसवर अरुण एडवे हा बेपत्ता झाला आहे, कोणाला दिसल्यास संपर्क करा असा आशयाचा मेसेज ठेऊन, इतरांना व्हायरल सुद्धा केला. या मेसेजनंतर सुद्धा अरुणचा शोध लागलाच नाही. दरम्यान 11 सप्टेंबर रोजी म्हणजेच तब्बल अकराव्या दिवशी अरुणचा मृतदेह गावाशेजारील एका विहिरीत सडलेल्या, तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आला.

शोधाशोधीनंतर अरुणचा मृतदेह मिळाला असला तरीही त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, त्यामुळे याप्रकरणी पोलिस आणखी कसून तपास करीत आहेत.अरुण एडवेच्या आत्महत्येमुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली असून त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले असावे असा प्रश्नाचा सूर प्रत्येक गावाकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी