35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeराजकीयJayant Patil : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का, जयंत पाटलांचा कडवा...

Jayant Patil : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का, जयंत पाटलांचा कडवा सवाल

खरंतर महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये जाणे हा नेहमीचा कळीचा मुद्दा ठरत असतो परंतु महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रयत्नांनी आणलेल्या प्रोजेक्टवर नव्या सरकारच्या कारनाम्यांमुळे पाणी सोडावं लागलं याचा धक्का विरोधी गटातील नेत्यांना बसला आहे. त्यामुळे यावर सत्ताधारी गटातून काय प्रतिक्रिया काय येणार त्याकडे आता सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. 

महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असणारा करोडोंचा प्रोजेक्ट गुजरातला मिळाला त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट – सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राला आश्वास्त केलेला हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येण्याऐवजी तो गुजरात मध्ये गेला ही बातमी वाचून थोडा धक्का बसल्याचे आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केल्या होत्या. अगदी त्याच प्रमाणे राष्ट्रावादी नेते जयंत पाटील यांनी सुद्धा याच मुद्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले असून महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा कडवा सवालच त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रश्नावर प्रत्युत्तर नेमकं काय येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करीत सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. जयंत पाटील ट्विटमध्ये लिहितात, वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे असे म्हणून पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 1.54 कोटीचा प्रोजेक्ट गुजरातने पळवला!

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडीच्या अध‍िकाऱ्यांची घेणार शाळा !

RTO forms special teams : छोटया अंतराचे भाडे नाकारण्याऱ्या टॅक्सी चालकांची आता खैर नाही !

पुढे जयंत पाटील लिहितात, महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे असे म्हणून नव्या राज्यसरकारला फैलावर घेतले आहे. या संपुर्ण पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सत्तालोलूप एकनाथ शिंदे सरकारवर त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

गुजरातच्या निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा सवालच जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित करून घडलेल्या गोष्टींबाबत जाब विचारला आहे. खरंतर महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये जाणे हा नेहमीचा कळीचा मुद्दा ठरत असतो परंतु महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रयत्नांनी आणलेल्या प्रोजेक्टवर नव्या सरकारच्या कारनाम्यांमुळे पाणी सोडावं लागलं याचा धक्का विरोधी गटातील नेत्यांना बसला आहे. त्यामुळे यावर सत्ताधारी गटातून काय प्रतिक्रिया काय येणार त्याकडे आता सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी