33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्रीडाINDvsSA T20I : सूर्याच्या फटकेबाजीमुळे रोहितने रचलाय इतिहास; अशी कामगिरी करणारा एकमेव...

INDvsSA T20I : सूर्याच्या फटकेबाजीमुळे रोहितने रचलाय इतिहास; अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय कर्णधार

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 237 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करून भारताने मालिकेत विजय मिळवला

सध्या टी20 विश्वचषकाची पुर्वतयारी म्हणून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरा सामना गुवाहाटी येथे खेळवण्यात आला. यावेळी अनेक गोष्टी नव्याने होताना पाहिल्या मिळाल्या. या मध्ये पहिल्या डावात भारत फलंदाजी करत असताना 8व्या षटकात मैदानात चक्क साप पहायला मिळाला. साप मैदानात शिरल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर गुवाहाटीमध्या सामना पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांना टीम इंडियाची अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 237 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करून भारताने मालिकेत विजय मिळवला. आणि हा विजय इतिहासात नोंद झाला. कारण यापूर्वी कधीही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला भारतात टी20 मालिकेत पराभूत करू शकला नव्हता.

हे सुद्धा वाचा

Smart TV Deal : हुर्रे! फक्त दोन हजारांत मिळणार ‘हा’ मोठा स्मार्ट टिव्ही

Narendra Patil : ‘हिंदुंना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही’

CBSE Board Exam 2023 : सीबीएसई बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर, वाचा सविस्तर…

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 3 बाद 221 धावाच करू शकला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने हा सामना 16 धावांनी जिंकतानाच एक विशेष कामगिरी केली. मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघाने दुसऱ्या टी20मध्ये उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला. केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 96 धावांची सलामी दिली. यानंतर सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि दिनेश कार्तिक शेवटी आले आणि त्याला संघाच्या मोठ्या स्थानावर घेऊन गेले. राहुलने 28 चेंडूत 57 धावा केल्या. सूर्याच्या बॅटमध्ये 22 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी पाहायला मिळाली, तर विराटने 49 आणि रोहितने 43 धावा केल्या.

दरम्यान, रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अभेद्य आघाडी घेतल्याने एक विशेष कामगिरी केली. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे काम करण्यात अपयशी ठरले होते. 2015 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला पाहुण्या संघाविरुद्ध 0-2 असा पराभव पत्करावा लागला होता. 2019 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. या वर्षी जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेने मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली होती. मात्र, यावेळी 3 सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 2-0 च्या विजयी आघाडीवर आहे. त्यामुळे जे काम महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली भारताचे कर्णधार म्हणून करू शकले नाहीत ते काम रोहित शर्माने केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी