31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeमनोरंजनAnnu Kapoor Fraud Case : अभिनेते अन्नू कपूर यांना चोरट्याने फसविले

Annu Kapoor Fraud Case : अभिनेते अन्नू कपूर यांना चोरट्याने फसविले

अभिनेते अन्नू कपूर यांच्यासोबत सायबर क्राईमचा प्रकार घडला असून एका तोतयाने आपण बॅंक कर्मचारी असल्याची बतावणी करत अन्नू कपूर यांना तब्बल लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

लुटण्याच्या बहाण्याने अनेकजण तोतया बनून, गोड बोलून अनेकांची फसवणूक करत असतात आणि अनेकजण दिलेल्या अमिषाला भूलून क्षणार्धात लाखो – करोडो रुपये घालवून बसतात त्यामुळे बँका, सरकारी संस्था, पतपेढ्या, इन्शुरन्स संस्थांकडून वारंवार सूचना देऊन सायबर क्राईमपासून सावध करण्यात येते परंतु तरीसुद्धा अनेकजण या सुचनेकडे सपशेल दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे याबाबतचे महत्व कसे सांगावे म्हणून या संस्थासुद्धा बुचकळ्यात पडल्याचे दिसून येतात. दरम्यान असेच काहीसे बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांच्यासोबत घडला आहे. एका तोतयाने आपण बॅंक कर्मचारी असल्याची बतावणी करत अन्नू कपूर यांना तब्बल लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, अन्नू कपूर हे ओशिवरा येथील मिरा टॉवरमध्ये वास्तव्यास आहेत. अचानक 29 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीचा त्यांना फोन आला आणि त्या व्यक्तीने आपण बॅंक कर्मचारी असल्याचे सांगत त्यांच्याकडून केवायसी अपडेटसाठी ओटीपी मागून घेतला. ओटीपी मिळताच संबंधित व्यक्तीने अन्नू यांच्या खात्यातून तब्बल 4 लाख 3 हजारांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. आपण एका मोठ्या बॅंकेतून बोलत असल्याचे भासवत त्या व्यक्तीने केवायसी तपशील अपडेट करण्याच्या बहाण्याने अन्नू कपूर यांना लूटले.

हे सुद्धा वाचा…

CBSE Board Exam 2023 : सीबीएसई बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर, वाचा सविस्तर…

Gandhi Jayanti 2022 : ‘गांधीजींसारखा बहुधा दुसरं कोणी होणे नाही’, राज ठाकरेंची विशेष पोस्ट

Mumbai News : चेंबूर हत्याकांड प्रकरणाची सत्ताधाऱ्यांकडून दखल

दरम्यान बॅंक खात्यातून अचानकपणे मोठी रक्कम गेल्याचे कळताच आपली फसवणूक झाल्याचे अन्नू यांच्या लक्षात आले आणि त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले आणि सदर घटनेची कल्पना पोलिसांना दिली. पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण गांभिर्याने घेत चपळाईने पैसे वळती झालेली खाती गोठवली आणि त्यांतून त्यांना तीन लाख रुपये वाचवण्यास यश आले. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे, तातडीच्या कारवाईमुळे अन्नू कपूर यांना बरीचशी रक्कम परत मिळणार आहे. खात्यातून 4 लाखांपेक्षा अधिक रक्कम काढली गेल्याची माहिती आता समोर आली आहे

दरवेळी केवळ सेलिब्रिटीच नव्हे तर अगदी सर्वसामान्य सुद्धा यामध्ये बळी पडतात आणि कमावलेली सगळी रक्कम एका क्षणात घालवून बसतात. दरवेळी ती रक्कम मिळतेच असे नाही त्यामुळे अशा कोणत्याच अमिषाला बळी पडू नका अशा आवाहनांकडे कोणालाच दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्नु मलिकांसारखे असे कित्तेकजण या सायबर क्राईमच्या हाती लागतात याचा आकडा प्रचंड मोठा आहे त्यामुळे जबाबदारीने, लक्षपुर्वक गोष्टी करणे इतकेच आपल्या हाती उरलेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी