31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील यांच्यावरील चित्रपट लवकरच...

मनोज जरांगे पाटील यांच्यावरील चित्रपट लवकरच…

मनोज जरांगेे पाटील यांच्यावर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

 

मुंबई ;
मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगेे पाटील यांच्यावर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. येत्या २६ एप्रिलला ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडली जाणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. या बहुचर्चित चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे.
यामध्ये संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या टीझरमधील “बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर समाजाचा… कुंकू पुसून तयार राहा” हा संवाद विशेष लक्षवेधी ठरतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी