25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रMLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, विकास लवांडे यांना संधी देण्याची...

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, विकास लवांडे यांना संधी देण्याची मागणी

टीम लय भारी

मुंबई : विधानपरिषदेच्या ( MLC Election )नऊ जागांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील दोन जागांसाठी माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना संधी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

प्रभाकर देशमुख व विकास लवांडे हे दोघेही पक्षाचे निष्ठावंत आहेत. देशमुख हे सनदी सेवेत होते. ते निवृत्त झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली होती. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजप व शिवसेनेमध्ये प्रवेश करीत होते. प्रभाकर देशमुख यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Coronavirus

देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांना तब्बल ७८ हजार मते मिळाली होती. अवघ्या १८०० मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. पराभव होऊनही देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने एक मोठी किमया केली. सातारा जिल्ह्यातील माण – खटाव मतदारसंघात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा जिवंत केला.

माण – खटाव हा मतदारसंघ पूर्वांपार राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु सन २००९ मध्ये जयकुमार गोरे यांनी शिरकाव केला. सुरूवातीला काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली, सन २०१४ मध्ये काँग्रेसकडून व सहा महिन्यांपूर्वी भाजपकडून अशा तिन्ही वेळा राजकीय तडजोडी करून गोरे यांनी माण – खटावमध्ये बस्तान बसविले.

विधानसभा निवडणुकीपासून देशमुख यांनी माण – खटाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट केले आहे. गावा गावांत जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची त्यांनी पुन्हा बांधणी केली आहे. माण – खटाव व सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करण्यासाठी प्रभाकर देशमुख कष्ट घेत आहेत.

देशमुख यांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर ( MLC Election ) संधी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. फेसबुक व वॉटस्अपवरूनही कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला आहे.

प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव देशमुख यांच्याकडे आहे. जलसंधारण, कृषी, शिक्षण व ग्रामविकास या क्षेत्रात देशमुख यांनी भरीव काम केलेले आहे. गेल्या १५ वर्षांत माण – खटावमध्ये राजकीय आर्शिर्वादाने गुंडगिरीने थैमान घातले होते. परंतु देशमुख यांनी राजकारणात प्रवेश केल्यामुळे माण – खटावमध्ये सभ्य राजकारणाचा नव्याने प्रवाह सुरू झाला आहे.

देशमुख यांच्या जमेच्या बाजू पक्षाने लक्षात घ्यायला हव्यात अशा भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.

दुसरी उमेदवारी ( MLC Election ) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना द्यावी अशीही जोरदार मागणी करण्यात येत आहे. सन २०१४ नंतर देशात व राज्यात भाजपचे जोरदार वारे वाहू लागले. यावेळी भाजपविरोधात बोलण्याची भूमिका फारच कमी नेते घेत होते. विकास लवांडे यांनी राष्ट्रवादीच्या पडत्या काळात पक्षाची जोरदार बाजू लावून धरली. भाजपवर त्यांनी सतत प्रहार केले.

लवांडे हे दिर्घकाळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. बहुजन विचारसणीचा त्यांनी नेहमी पुरस्कार केला. समाजविघातक हिंदुत्वविचारसरणीच्या विरोधात ते सतत बोलत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचेही काम त्यांनी केले आहे. त्यामुळे लवांडे यांना उमेदवारी द्यावी अशीही जोरदार मागणी कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( MLC Election ) वाट्याला दोन जागा आल्या असल्या तरी या जागेसाठी अनेकांची नावे चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशमुख व लवांडे यांच्या व्यतिरिक्त अमोल मिटकरी, हेमंत टकले, महेश तपासे, शशिकांत शिंदे आदी नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. विशेषतः अमोल मिटकरी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला फार मोठे योगदान दिले होते.

मिटकरी यांच्याकडे जबरदस्त वक्तृर्त्वशैली आहे. शिवाजी महाराज, शाहू – फुले – आंबेडकर, संत परंपरा असे विचार ते अत्यंत प्रभावीपणे मांडतात. भाजपचे हिंदुत्व कसे ढोंगी आहे, हे ते उदाहरणांसह पटवून सांगतात. त्यांच्या भाषणांमुळे विधानसभा निवडणुकीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.

भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीतील उणिवा लोकांना ते सहजपणे पटवून सांगतात. मिटकरी यांनी पक्षाला महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना ( MLC Election ) उमेदवारी द्यावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

निवडणूक बिनविरोध होणार ?

या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी आपसांत समझोता करून जागा वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध ( MLC Election ) होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप चार, शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेस दोन व काँग्रेस एक अशा नऊ जागांचे वाटप झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेकडून उद्धव ठाकरे व निलम गोऱ्हे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे व चंद्रकांत बावनकुळे यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या वाट्याला अवघी एकच जागा आलेली आहे. मात्र इच्छूकांची संख्या मोठी आहे. या एकमेव जागेसाठी सचिन सावंत, संजय दत्त, मुझफ्फर हुसेन, कल्याण काळे, मोहन जोशी, नसीम खान यांची नावे चर्चेत आहेत.

येत्या २१ मे रोजी होणार निवडणूक

या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक ( MLC Election ) होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मे आहे. १४ मे रोजीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ मे रोजी निवडणूक झाल्यानंतर निकाल त्याच दिवशी सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभेच्या आमदारांमधून हे नऊ उमेदवार विधानपरिषदेसाठी पाठविले जाणार आहेत.

चारही प्रमुख पक्षांनी आपसांत समझोता केलेला असल्यामुळे प्रत्यक्षात निवडणूक ( MLC Election ) होण्याची शक्यता कमी आहे. सगळे नऊ उमेदवार बिनविरोध निवडून येतील.

उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडथळा दूर होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोणत्याही सभागृहाचे आमदार नाहीत. येत्या २७ मे रोजी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला सहा महिने पूर्ण होत आहेत. त्या अगोदरच या नऊ जागांसाठीची ( MLC Election ) निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन ते आमदार झालेले असतील. त्यामुळे ठाकरे यांच्या समोरील मोठा अडथळा दूर होईल असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांकडून गोरगोरीबांना धान्य वाटप

AwhadvsBJP : ‘घाणेरडे लिखाण करणाऱ्या संघिष्ट कार्यकर्त्यांची भाजपने जबाबदारी घ्यावी’

राष्ट्रवादीला ‘छिन्न विछिन्न’ म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी दाखविली आपली ‘पॉवर’

EC allows polls to 9 Maharashtra legislative council seats on 21 May

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी