29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरनोकरीMPSC अंतर्गत होणार ४३३ पदांची भरती

MPSC अंतर्गत होणार ४३३ पदांची भरती

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी (MPSC) अंतर्गत ४३३ पदांची भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी, सहायक संचालक, भाषा संचालक या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. आज (दि. २५ जुलै २०२२) पासून या पदांच्या भरतीसाठीचे ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या पदांसाठी १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच या संकेतस्थळावर आयोगाकडून सविस्तर सूचनांचे देखील विश्लेषण करण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवारांना शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. यासाठी अमागास वर्गाकडून ७१९ रु. तर मागासवर्गीय वर्गाकडून ४४९ रु. आकारण्यात येतील.

सदर पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना शुल्क भरणे अनिर्वाय राहणार आहे. शुल्क भरल्याशिवाय उमेदवाराचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. http://mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर या पदांच्या जाहिरातींबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

MPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव

शिवसेनेला धक्का! मोदी सरकारकडून आदित्य ठाकरेंवर कारवाई?

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!