25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्र"राज्य सरकार सोडून सगळा महाराष्ट्र आजारी..." नांदेड घटनेवरून राज ठाकरे सरकारवर बरसले!

“राज्य सरकार सोडून सगळा महाराष्ट्र आजारी…” नांदेड घटनेवरून राज ठाकरे सरकारवर बरसले!

नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र खवळला गेला असून आता औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातही मागील 24 तासांत 18 रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. राजकीय वर्तुळातही यावरुन राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड टीका करण्यात येत असून विविध पक्षांच्या नेत्यांनी यावरुण राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढले असून ‘राज्य सरकारमधील तीन पक्ष सोडून सगळा महाराष्ट्र आजारी आहे,’ अशा शेलक्या शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे.

नांदेड शासकीय रुग्णालयातील 24 तासात तब्बल 24 रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेने खळबळ माजली आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातही मागील 24 तासात 18 रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. यात 2 नवजात बालकांचाही समावेश आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात केवळ 15 दिवसांचा औषधसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. मागील 2 दिवसात या रुग्णालयात तब्बल 34 रुग्ण दगावले आहेत.


नांदेड मधील दुर्दैवी घटनेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले, “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.”

हे ही वाचा

नांदेड रुग्णालयातील घटनेनंतर आता घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 मृत्यू…

नांदेडच्या सरकारी रुग्णालयात 24 तासांत 24 जणांचा मृत्यु; उद्या चौकशी समिती जाणार

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, बहुजनांनो एक व्हा ! भारत तुमचा आहे

याअगोदर, ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 22 रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. असे असताना, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णाचा मृत्यू झाला. आणि आता औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 रुग्ण दगावल्याने गाढ झोपेत असलेली महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा कधी जागी होईल? असा प्रश्न पडला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी