27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक शहरात दूषित पाणी; शिवसेना करणार आंदोलन

नाशिक शहरात दूषित पाणी; शिवसेना करणार आंदोलन

प्रभाग क्रमांक २४ मध्ये कमी दाबाचा व अवेळी पाणी पुरवठा होत आहे. बाजीरावनगरजवळील विधातेनगर येथे तीन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे.प्रभाग क्रमांक २४ मधील कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क या भागात सतत कमी दाबाचा व अवेळी पाणी पुरवठा होत आहे. बाजीरावनगरच्या विधातेनगर येथे तीन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे, यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रहिवाशी विष्णू विधाते यांनी ही समस्या सोडविण्याची मागणी शिवसेनेकडे केली. प्रभागात स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा करा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे .

अनेकदा तक्रारी करूनही यात सुधारणा होत नाही. याबाबत सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, मनोज पाटील, मनोज वाणी, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सतीश मणिआर, सचिन राणे, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, तसेच पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही बुधवारी, ३१ जानेवारी रोजी याबाबत निवेदन देण्यात आले.

नाशिक जिल्हात देखील यापूर्वी दूषित पाणीमुळे नागरिकांना त्रास झाला आहे  . जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एक हजार ८३९ नमुन्यांपैकी तपासणीत जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील २७ गावांतील पाणी नमुने दूषित आढळले. यात सिन्नर तालुक्यातील सर्वाधिक नऊ पाण्याचे नमुने (१४ टक्के) दूषित आहेत. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असून, पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होऊ लागला आहे. दुसरीकडे उपलब्ध पाण्याचे काही स्रोत दूषित आढळत आहे. त्यामुळे उपाययोजना करूनही दूषित पाण्याचा वापर करावा लागतो. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात.दर महिन्याला ही तपासणी केली जाते. यात नोव्हेंबरमध्ये १५ तालुक्यांतील एक हजार ८३९ गावांमधील पाण्याचे नमुने घेतले असता यातील २७ नमुने दूषित आढळले. दूषित पाणी व ब्लिचिंग पावडरचे नमुने आढळणाऱ्या ग्रामपंचायती तसेच पंचायत समितींना नोटीस बजावण्यात येते. दुसरीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोनदा केले जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी