28 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलला कमी विद्युत दाबाचा फटका

नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलला कमी विद्युत दाबाचा फटका

नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तब्बल पन्नास कोटी खर्च करुन महापालिकेच्या शंभर पैकी 82 शाळा स्मार्ट करण्यात आल्या आहेत. खासगी शाळांप्रमाणेच महापालिकेच्या विद्यार्थ्याना सुविधा मिळाव्यात याकरिता स्मार्ट स्कूल अंतर्गत वर्ग खोल्या डिजीटल बनवण्यापासून ते कॉम्प्युटर कक्ष, सीसीटीव्ही अशा अत्याधुनिक सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दरम्यान स्मार्ट स्कूलमध्ये कार्यन्वयीत केलेल्या डिजीटल बोर्ड, कॉम्प्युटर, फॅन यासह इतर गोष्टींना लघू दाबाच्या वीज मीटर चा फटका बसत असल्याने शाळेला नाइलाजास्तव एकाचवेळी सर्व डिजीटल वर्गामध्ये विद्युत पुरवठा न करता टप्याटप्याने करुन स्मार्ट स्कूलचे वर्ग चालवले जात आहेत. 

मागील काही वर्षापासून खासगी इग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढल्याने मनपाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटली आहे. पालकांची ही मानसिकता बदलण्यासाठी तसेच विद्यार्थ्याना संगणक हातळ्ण्याबरोबरच डिजीटल अभ्यासक्रमाद्वारे ज्ञानाचे धडे गिरवता यावे. याकरिता स्मार्ट स्कूलची संकल्पना राबवली जात आली. दरम्यान आतापर्यत एकुण 82 शाळा स्मार्ट झाल्या असल्या तरी त्या पूर्णक्षमतेने सुरु करताना तांत्रिक अडचनी येत आहे. शाळांमध्ये जुने विद्युत वीज मीटर असल्याने आणि स्मार्ट स्कूल अंतर्गत विविध विद्युत पुरवठा आवश्यक असलेली उपकरणे वर्गामध्ये बसवल्याने विद्युत दाबाची अडचन येत आहे. शाळांमध्ये डिजिटल लॅबदेखील उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये आयटी आणि आयटीसीबाबतचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. लॅबमध्ये कॉम्प्युटर्स, तसेच इंटरनेट सुविधा असल्याने यामुळे कॉम्प्युटरविषयीचे ज्ञान, इंटरनेट वापराचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. पहिली ते दहावीपर्यंतचा राज्य सरकारचा सर्व अभ्यासक्रम हा डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याबाबत मनपाच्या शिक्षकांना गेल्या महिन्यात प्रशिक्षण देण्यात आले. महापालिका शाळांच्या डिजिटलायझेशनमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये ज्या सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात त्या सर्व सुविधा आता विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत मिळणार आहेत. डिजिटल वर्गांमुळे शिक्षकांनादेखील विद्यार्थ्यांना शिकविणे सोपे होणार आहे. अवघड विषय सोप्या पद्धतीने शिक्षकांना मांडता येणार आहेत. परंतु विद्युत पुरवठयामुळे स्मार्ट स्कूलला फटक बसत असल्याचे चित्र आहे.

पायाभूत सुविधा मधील तफावत दूर करणे.- शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा दृष्टिकोन विकसित करणे.- आयटी, इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य, स्वच्छता, क्रीडा सुविधा.- माहिती व तंत्रज्ञान पायाभूत सुविधा.- आयसीटी उपकरण व संसाधन, अध्यापन पद्धती आदींचा अभ्यास.- इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विकसित करणे. स्मार्ट स्कूल उपक्रमांतर्गत खासगी शाळांप्रमाणेचं प्रत्येक शाळा वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्ड, संगणक, प्रोजेक्टर, सीसीटीव्ही राहणार आहेत. टॅबचा माध्यमातून डिजिटल हजेरी घेतली जाणार आहे. पाठ्यक्रम व शालेय साहित्य इ-कंटेंटच्या स्वरूपात दिली जाणार आहे. प्रत्येक स्मार्ट स्कूलमध्ये जापनीज तंत्रज्ञानाच्या मियावाकी फॉरेस्टची संकल्पना राबविली जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी