28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपतीस सर्पदंश तिघा आरोपीना पाच दिवस पोलीस कोठडी

पतीस सर्पदंश तिघा आरोपीना पाच दिवस पोलीस कोठडी

आपल्या साथीदारांसह मिळून थेट पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने विषारी सर्प दंश करून गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोघा महिलांसह एक सर्पमित्राला अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोन्ही मैत्रिणींमध्ये शारीरिक आकर्षण आणि सम लैंगिक संबंध असल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या विशाल पोपटराव पाटील, ४१, रा. साईप्रसाद बंगला, उज्ज्वल नगर, एअरफोर्स स्टेशन गेटजवळ, बोरगड, नाशिक याची पत्नी संशयित सोनी उर्फ एकता विशाल पाटील हिने शनिवार दि. २७ रोजी संध्याकाळी विशालला बियर पाजले.

आपल्या साथीदारांसह मिळून थेट पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने विषारी सर्प दंश करून गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोघा महिलांसह एक सर्पमित्राला अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोन्ही मैत्रिणींमध्ये शारीरिक आकर्षण आणि सम लैंगिक संबंध असल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या विशाल पोपटराव पाटील, ४१, रा. साईप्रसाद बंगला, उज्ज्वल नगर, एअरफोर्स स्टेशन गेटजवळ, बोरगड, नाशिक याची पत्नी संशयित सोनी उर्फ एकता विशाल पाटील हिने शनिवार दि. २७ रोजी संध्याकाळी विशालला बियर पाजले.

 

नाशकात पतीला सर्पदंश करणारी निर्दयी पत्नी साथीदारासंह अटकेत

घरात एका अज्ञात संशयिताला बोलावून घेत विशालला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अज्ञात संशयिताने गळा आवळला तर पत्नी एकता हिने हेल्मेटने मारहाण करत उशीने तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विशाल जीव वाचविण्यासाठी झटापट करत असल्याने संशयित चेतन याने आपल्या सोबत आणलेल्या घोणस जातीच्या विषारी सापाचा चावा विशालला दिला होता. मात्र, याच वेळी विशालने आपली सुटका करून घेत पळ काढत आपला जीव वाचविला होता. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी तात्काळ दोन पथके तयार करून त्यांना संशयिताच्या मागावर पाठवले होते. या गुन्ह्यामध्ये मुख्य संशयित असलेली विशालची पत्नी सोनी उर्फ एकता विशाल पाटील, ३४, रा. साईप्रसाद बंगला, उज्ज्वल नगर, एअरफोर्स स्टेशन गेटजवळ, बोरगड, नाशिक, संशयित सर्पमित्र चेतन प्रवीण घोरपडे, २१, रा. लातूर, आणि माधुरी संतोष कुलकर्णी, ३४, रा. लातूर यांना लातूर जिल्ह्यातून अटक केली होती. गुरुवार दि. १ रोजी या संशयितांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार दि. ५ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

विशालची पत्नी एकता आणि लातूर येथील माधुरी कुलकर्णी या दोन्ही बालपणीच्या मैत्रिणी असून पैठण येथे जवळपास दहावी पर्यंत शिक्षण सोबत घेतले आहे. त्या अनेक वर्ष एकत्र राहिल्याने या दोघींमध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होऊन सम लैंगिक संबंध निर्माण झाले होते. त्यात लग्नानंतर विशाल हा दारू पिऊन अनेकदा त्रास देत असल्याबाबत एकता हिने माधुरीला सांगितले होते. त्यामुळे आपल्या मैत्रिणीला मदत करून यातून सोडवायचा या विचारातून माधुरी हिने कट रचल्याचे समोर आले आहे. या सर्व कटाची तयारी जवळपास गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सुरु करण्यात आली होती.
संशयित चेतन याला माधुरी कुलकर्णी हिने काही दिवसांपूर्वी दुचाकी विकत घेऊन दिली होती. याच दुचाकीवरून चेतन याने लातूर ते नाशिक असा प्रवास करत संशयित एकताचे घर गाठले. चेतन याला घराचा ठावठिकाणा माहित नसल्याने एकता हिने माधुरीला आपले लोकेशन पाठवले ते लोकेशन माधुरीने चेतनला पाठवले आणि त्यानुसार चेतन थेट एकताच्या घराबाहेर पोहचला. आणि पुढे ठरल्याप्रमाणे विशालला मारण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वी माधुरी हिच्या घरात घोणस साप निघाल्याने तो साप देखील विशाल याने पकडून एका बरणीत ठेवत माधुरी हिच्याकडे दिला होता. त्यानंतर या सापाला बघून माधुरी हिच्या डोक्यात विशालला सर्पदंश करून मारण्याचा विचार आला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चेतन हा पोलीस भरतीला गेला असता त्यामध्ये साप पकडण्याचे शिक्षण देण्यात आले होते. त्याला याबद्दल आकर्षण वाटल्याने त्याने सापांच्या माहितीबाबत अनेक पुस्तके वाचून सर्पमित्र बनला होता. खूप असा जुना नाही नव्याने सर्पमित्र बनला असल्याचे तपासात पुढे आले आहे. सध्या तो एका वाहन शोरूम मध्ये कामाला आहे.
चौकट : घोणस जातीचा साप गेल्या दहा बारा दिवसांपासून पकडून बरणीत ठेवला असल्यामुळे त्याच्या विषाची आणि चावा घेण्याची क्षमता कमी झाल्याने विशाल सर्पदंश होऊन देखील त्याचे प्राण वाचले आहे. विशेष म्हणजे झटापटी दरम्यान संशयित चेतन याला देखील सापाने चावा घेतला होता. मात्र, त्यात त्यालाही काही झाले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी