29 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रनवरात्रीचे नऊ रंग आणि त्यांचे महत्व

नवरात्रीचे नऊ रंग आणि त्यांचे महत्व

आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यात पडत असणारा चतुर्मास. प्रचार महिन्यात आपण अनेक व्रतवैकल्य आणि सर साजरे करतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदिय नवरात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. नऊ दिवसांच्या नवरात्रीला आपल्याकडे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आहे. शरद ऋतुच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदिय नवरात्रोत्सव असे देखील म्हटले जाते. नऊ दिवसात देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते.

भारतीय धर्मात नऊ आकड्याला अनन्यसाधारण शास्त्रीय आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. नऊ महिने नऊ दिवसांनी जन्माला येणारे मुल, मातीत धान्य पेरल्यानंतर नऊ दिवसांनी येणारा कोंब, मातृशक्ती, आदिशक्तीचे मनोभावे केली जाणारी पूजा म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसांमध्ये आपल्याकडे देवीचे भक्ता नवरात्रीचे उपवास करतात आणि उपवासात सात्विक अन्नग्रहण करण्याकडे त्यांचा ओढा असतो. स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा संदेश देणाऱ्या नवरात्रीत दिला जातो.

रविवारी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरु झाली. २४ ऑक्टोबर रोजी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला नवरात्रीची समाप्ती होईल. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट रंग असतो जो दुर्गा देवीच्या विशिष्ट पैलूचे प्रतिनिधित्व करतो. यंदाच्या वर्षी नऊ दिवसांचे रंग आपण जाणून घेऊया.

  1. प्रतिपदा – नारंगी रंग
    पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित केला जातो. देवी शैलपुत्री संपत्ती आणि भाग्य उजाळते. देवीच्या आशीर्वादासाठी या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान केले जाते.
  2. द्वितीया – पांढरा रंग
    दुसऱ्या दिवशी बुद्धी आणि समंजसपणाची प्रतीक असलेली ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. तिचा आवडता रंग पांढरा आहे, जो शुद्धता आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो
  3. तृतीया – लाल रंग
    तिसर्‍या दिवशी, कृपा आणि शौरर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. देवी चंद्रघंटा लाल शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. हा रंग तृतीया तिथीला सकारात्मकता, शक्ती आणि धैर्य प्रदान करतो असे म्हटले जाते.
  4. चतुर्थी – निळा रंग (रॉयल निळा)
    चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. देवी कुषमांडाची आराधना केल्यास अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल केली जाते अशी धारणा आहे. निळा रंग शक्ती आणि संपत्तीचे प्रतीक आहे. आरोग्य आणि नशीब उंचावण्यासाठी देवी कुष्मांडाचे स्मरण केले जाते.
  5. पंचमी – पिवळा रंग
    पाचव्या दिवशी भक्त सुख, शांती आणि संपत्तीसाठी स्कंदमातेची पूजा करतात. तिचा आवडता रंग पिवळा. म्हणून पंचमीला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचे ठरले आहे. पिवळारंग घरात आनंद आणि विपुलता आणतो.
  6. षष्ठी – हिरवा रंग
    सहाव्या दिवशी पूजा केली जाणारी देवी कात्यायनी शांतीचे प्रतीक आहे. तिचा आवडता रंग हिरवा आहे. हिरवा रंग संतुलन आणि प्रगती दर्शवतो. हिरवा रंग जवळ बाळगल्यास स्वभाव आनंदी राहतो.
  7. सप्तमी – राखाडी रंग
    कालरात्री हे दुर्गेचे उग्र रूप मानले जाते. सातव्या दिवशी साजरी केली जाते. राखाडी शक्ती आणि लवचिकता दर्शवते, अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे.
  8. अष्टमी – जांभळा रंग
    आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. ती तिच्या अनुयायांना शांतता आणि सहनशीलता देते असे म्हटले जाते. तिचा आवडता रंग जांभळा आहे, जो शुद्धता, शांती आणि देवत्व दर्शवतो.
  9. नवमी – मोर हिरवा
    आध्यात्मिक शक्ती काळजीवाहक देवी सिद्धिदात्रीचा नवव्या दिवशी सन्मान केला जातो. तिला यश आणि संपत्तीची पूजा केली जाते. तिचा आवडता रंग, मोरपंखी हिरवा, ज्ञान, शहाणपण आणि अज्ञानाच्या समाप्तीचे प्रतीक आहे.

हे ही वाचा 

नवरात्रीच्या खरेदीसाठी बाजारात लगबग वाढली

अंबाबाईचा नवरात्रोत्सव ‘लय भारी’

नवरात्रीच्या घागरा चोळीची खरेदी करायचीये? ही आहेत मुंबईतील ७ प्रसिद्ध ठिकाणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी