33 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमंत्रालयराज्य सरकार लवकरच भरणार 30 हजार शिक्षकांची पदे

राज्य सरकार लवकरच भरणार 30 हजार शिक्षकांची पदे

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा सामूहिक पद्धतीने सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी या निर्णयाला विरोध केलेले आहे. असे असताना ‘राज्य सरकार 23 जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. राज्यात शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यातील लाखो उमेदवारांचं रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लक्ष लागलं आहे. असे असताना सरकार जर रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढते तर ते शाळांची दुरुस्ती, तिथे चांगले शिक्षण मिळावे यासाठी पर्यटन का करत नाही, असंही सवाल केला जात आहे.

राज्यात शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली होती. पण आता अखेर शिक्षक भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून 23 जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासंदर्भात तारीख जरी अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली, तरी यासंदर्भात तातडीची पावलं राज्य सरकारकडून उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा
मीरा बोरवणकरांचे आणखी गंभीर खुलासे! थेट आर आर पाटलांचे घेतले नाव…
खुशखबर! सार्वजनिक बांधकांम विभागात 2109 पदांची सरळसेवा मेगाभरती
युद्ध का थांबत नाही?

आतापर्यंत बिंदूनामावली सोबतच इतर काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे. तसेच, राज्यातील शिक्षण भरती प्रक्रियेसंदर्भातील संकेतस्थळ असलेल्या पवित्र संकेतस्थळामार्फत प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहितीही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

राज्यातील लाखो उमेदवारांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांच्या जाहीरातीकडे लागलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण परिषदेसाठी पुण्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या शिक्षण भरती प्रक्रियेसंदर्भाती घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी