33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रप्रजासत्ताक दिनी २६०० किलो ई कचरा जमा

प्रजासत्ताक दिनी २६०० किलो ई कचरा जमा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन व नाशिक मधील कॉम्पुटर सोसायटी ऑफ इंडिया (CSI) व पर्यावरण संरक्षण गतीविधी सोबत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने, २६ जानेवारी २०२४ रोजी, नाशिक शहरात ई-कचरा संकलनाची भव्य मोहीम राबविण्यात आली. यामाध्यमातून सुमारे २६०० किलो ई कचऱ्याचे संकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन हे दोन्ही उद्देश्य साध्य करत सदर मोहीम यशस्वी झाली. ई-यंत्रण ही मोहीम दरवर्षी २६ जानेवारीला राबविली जात असून हे सलग दुसरे वर्ष आहे. यावर्षी नाशिक सोबतच आणखी ८ शहरांमध्ये ही मोहीम राबविली गेली.

समाजात इ-कचऱ्याच्या समस्येविषयी जनजागरण, जनसहभाग व जनआंदोलन योजणे आणि रिसायकलिंग किंवा योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुयोग्य रचनेत जमा करण्याची सवय लावणे हा या सामाजिक उपक्रमाचा उद्देश्य आहे. या मोहिमेनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांमध्ये सुमारे ६० केंद्रे उभारली गेली आणि ह्या केंद्रांमार्फत २६०० किलो ई-कचऱ्याचे संकलन झाले. शहरातील नागरिकांनी दाते आणि स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. २०० हून अधिक स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत योगदान दिले तर ३०० हून अधिक दात्यांनी ई-कचरा जमा केला.

या कार्यक्रमाला सहयोगी संस्थांमधून नाशिक फर्स्ट, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन (NDTA), अंबड इंडस्ट्रीयलिस्ट अँड मनुफॅक्चरर असोसिएशन (AIMA), नाशिक इंडस्ट्रीयलिस्ट अँड मनुफॅक्चरर असोसिएशन (NIMA), स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट (SFD), कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ नाशिक (CAN) व शहरातील अन्य विविध सामाजिक संस्थांच्या विशेष सहभाग लाभला.

 

जमा झालेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातील पुनर्वापर करता येईल अशा वस्तू, उपकरणांची दुरुस्ती करून गरजू सामाजिक संस्था, ग्रामीण भागातील शाळा, अनाथाश्रम या ठिकाणी दान दिला जाईल व अन्य निरुपयोगी ई-कचऱ्याचे शास्त्रीय व पर्यावरणपूरक पद्धतीने रिसायकलर्सकडे विल्हेवाटीसाठी दिला जाणार. ई-कचऱ्यामुळे पर्यावरणाला आणि पर्यायाने आपल्याला मोठा धोका आहे त्यामुळे त्याचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नाशिक शहरात हा उपक्रम राबविला. रिसायकलिंग करण्याच्या किंवा योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा कचरा योग्य रचनेत जमा करण्याची सवय लावणे हा या अभियानामागील उद्देश आहे.
– श्रीवर्धन मालपुरे, समन्वयक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी