30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या ३२ तक्रारी

नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या ३२ तक्रारी

लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे जिल्हामुख्यालयात सी-व्हिजील अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाच्या ३२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात वाहनांवर राजकीय पक्षांचे झेंडे लावणे, भिंतीवर राजकीयपक्षांची रंगवलेली चिन्ह कायम असणे, यासह विविध तक्रारींचा समावेश आहे.अ‍ॅपवर तक्रार दाखल आल्यानंतर पुढच्या १०० मिनिटांत त्याचा निपटारा केला जात आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन जागांसाठीदि. २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्याभरात आदर्श आचारसंहिता लागू आहे.

लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे जिल्हामुख्यालयात सी-व्हिजील अ‍ॅपवर आचारसंहिता (Violation) भंगाच्या ३२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात वाहनांवर राजकीय पक्षांचे झेंडे लावणे, भिंतीवर राजकीयपक्षांची रंगवलेली चिन्ह कायम असणे, यासह विविध तक्रारींचा समावेश आहे.अ‍ॅपवर तक्रार दाखल आल्यानंतर पुढच्या १०० मिनिटांत त्याचा निपटारा केला जात आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन जागांसाठीदि. २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्याभरात आदर्श आचारसंहिता लागू आहे.
(32 complaints of violation of model code of conduct in Nashik district)

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठीनिवडणूक आयोगाने सी-व्हिजील अ‍ॅप उपलब्ध करुन दिले आहे. या अ‍ॅपवर दाखलतक्रारींचा शंभर मिनिटांमध्ये निपटारा केला जाईल, अशी ग्वाही आयोगानेदिली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ३२ तक्रारी दाखल केल्या. सी-व्हिजलवर दाखल तक्रारींमध्ये विकासकामाचा कापडाने झाकलेला फलक उघडा पडणे, वाहनांवर सर्रासपणे पक्षांचे राजकीयझेंडे लावणे, सार्वजनिक ठिकाणी भिंतीवरील राजकीय पक्षांनी त्यांचे पक्षचिन्ह व नेत्यांचे छायाचित्रावर रंग मारलेला नसणे, फलक उभारणे अशावेगवेगळ्या तक्रारींचा यात समावेश आहे. अ‍ॅपवर तक्रारी दाखल झाल्यानंतरप्रशासनाकडून तातडीने त्याची दखल घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील पंचवार्षिकला २०१९ ला १८ गुन्हे दाखल होते
जिल्ह्यात २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिताभंगप्रकरणी जिल्ह्यात एकुण १८ गुन्हे दाखल झाले होते. त्यात नाशिकशहरातील ६ तर उर्वरित १२ गुन्हे ग्रामीण भागातील आहेत. यातील काहीकेसेसबाबत आजही न्यायालयात नियमित सुनावणी होत असल्याचे समजते.

तक्रारीसाठी करा थेट फोन!
निवडणूक संदर्भातील तक्रारींची नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनानेस्थापित केलेल्या आचारसंहिता कक्षातील ०२५३-२९९५६७१ आणि ०२५३-२९९५६७३ हेदोन दूरध्वनी कार्यान्वित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने१९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. या टोल फ्रीक्रमांकावर कॉल करून मतदानाची तारीख जाणून घेणे, मतदानाची वेळ माहीत करूनघेणे, मतदार यादीत नाव शोधणे, मतदानासाठी आवश्यक असलेल्या निवडणूकओळखपत्राव्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून विहित केलेल्या इतर १२ ओळखपत्रांचीमाहिती घेणे यांसारख्या विषयांवर चौकशी करता येईल. हा टोल फ्री क्रमांक२४ तास कार्यरत राहणार आहे.मतदानासाठी आवश्यक असलेल्या निवडणूकओळखपत्राव्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून विहित केलेल्या इतर १२ ओळखपत्रांचीमाहिती घेणे यांसारख्या विषयांवर चौकशी करता येईल. हा टोल फ्री क्रमांक२४ तास कार्यरत राहणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी