31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयकाँग्रेसच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरातांनी काढली नाराजांची समजूत

काँग्रेसच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरातांनी काढली नाराजांची समजूत

निवडणूकीत अनेकांना इच्छा अपेक्षा असतात. त्यामुळे मतभेद, नाराजी होते. मात्र आम्ही सर्वांचे रुसवे फुगवे काढू. सर्वांनी जोमाने काम करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधीमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष माजी आ. शिरीष कोतवाल यांची नियुक्ती झाल्याबद्दल व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. थोरात बोलत होते.यावेली व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष माजी आ. शिरीष कोतवाल, आकाश छाजेड, ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ . हेमलता पाटील, माजी आमदार हिरामण खोस्कर, तुषार शेवाळे, शरद् आहेर, शाहू खैरे, अनिल आहेर, हेमंत टकले, वत्सला खैरे, स्वाती जाधव आदी उपस्थित होते.

निवडणूकीत अनेकांना इच्छा अपेक्षा असतात. त्यामुळे मतभेद, नाराजी होते. मात्र आम्ही सर्वांचे रुसवे फुगवे काढू. सर्वांनी जोमाने काम करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधीमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष माजी आ. शिरीष कोतवाल यांची नियुक्ती झाल्याबद्दल व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. थोरात बोलत होते.यावेली व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष माजी आ. शिरीष कोतवाल, आकाश छाजेड, ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ . हेमलता पाटील, माजी आमदार हिरामण खोस्कर, तुषार शेवाळे, शरद् आहेर, शाहू खैरे, अनिल आहेर, हेमंत टकले, वत्सला खैरे, स्वाती जाधव आदी उपस्थित होते.(Balasaheb Thorat convinces dissidents Congress rally)

आ. थोरात यांनी लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. मे २०२५ पर्यंत निवडणूकांचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने या लोकसभा निवडणूकीच्या वेळी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा. या निवडणूकांकडे संधी म्हणून बघा असे सांगितले. नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात संतप्त भावना आहेत. त्यांनी ही निवडणूक हातात घेतली असून फक्त मोदी आणि भाजपाला पाडायचे असे मतदारांनी ठरवलेले आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत मतदारांकडे काँग्रेसची बाजू मांडावी, पक्षबांधणी करावी. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी भाजपाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. चुकीच्या प्रचाराच्या जोरावर त्यांनी मतदारांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे कँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या प्रत्येक आरोपाला उत्तर द्यावे, काँग्रेसची भूमीका पटवून द्यावी. त्यासाठी प्रत्येकाने वाचन वाढवले पाहिजे, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे नागरिक भारावले असून काँग्रेसकडे कल वाढत आहे असे सांगितले.

माजी जिल्हाधक्ष्य डॉ. तुषार शेवाळे यांनी मी संधी घेतली आणि जागा सोडली. शिरीष कोतवाल यांच्या आमदारकीचा मी साक्षीदार आणि भागीदार आहे. हार जीत होत असते मात्र संधी मिळने मह्त्वाचे असते आता शिरीष कोतवाल; नवे चैतन्य निर्माण करतील असे सांगितले. त्याचप्रमाणे स्टार प्रचार निरंजन टकले यांनी सांगितले की, हुकुमशाही प्रवृत्ती पराभूत करण्याची ही वेळ आहे. त्यासाठी प्रत्येकाने मजबुतीने व जोडीने काम करण्याची आवश्यकता आहे.
शरद आहेर यांनी काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ तुषार शेवाळे आहेत. नाराजीमुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला मात्र निवडणूक काळात कोणतेही पद रिक्त ठेवता येत नाही. महागाई, बेरोजगारी मुळे देश संकटात आहे त्यामुळे कामगार आणि शेतकरी यांना कधी एकदा जाऊ आणि बटन दाबू असे झाले आहे. त्यामुळे दिंडोरी, धुळे आणि नाशिक मध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार काम करावे असे आवाहन आहेर यांनी केले.

साहेबानी बिनटाक्याचे ऑपरेशन केले
लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही यांची खंत व्यक्त करत डॉ . तुषार शेवाळे यांनी फटकेबाजी केली. बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल बोलताना साहेब हसले कि समजायचे काहीतरी गडबड आहे . कारण ते हसून आणि न बोलता ऑपरेशन करतात. जसे माझे केले आणि मला समजले देखील नाही आमच्याकडे दोन पैसे कमी असतील पण आम्हाला लोकांच्या हृदयात जागा आहे. मात्र थोरातांनी भरभरून प्रेम दिले असे शेवाळे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी