29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeआरोग्यशिजवलेलं अन्न किती काळ फ्रिजमध्ये ठेवावं? जाणून घ्या

शिजवलेलं अन्न किती काळ फ्रिजमध्ये ठेवावं? जाणून घ्या

उन्हाळा सुरु झाला की, गृहिणी शिल्लक राहिलेलं अन्न खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतात. पण तज्ज्ञांच्या मते फ्रिजमध्ये स्टोअर केलेले अन्न खाणे योग्य नाही. जास्त काळ फ्रिजमध्ये जेवण राहिले तर फूड पॉईझनिंगचा धोका वाढतो. कधी कधी काही पदार्थांचा रंग आणि स्वाद बदलत नाही, त्यामुळं गृहिणींचा मोठं गोंधळ उडतो. चांगल आहे की खराब असा अनेकदा प्रश्न पडतो. या घोळात फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न खाल्ल जातं. पण..हे शिजवलेलं अन्न किती काळ फ्रिजमध्ये ठेवावं यालाही मर्यादा आहे. (Health care How long should you store cooked food in fridge)

रेफ्रिजरेशन दरम्यान तुम्ही जर शिजलेले अन्न एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर हे अन्न एक – दोन दिवस ते जास्तीत जास्त आठवडा योग्य ठरते.

उकडलेल्या आणि शिजवलेल्या भातामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे १-२ दिवसात संपवावे. भारतीय पदार्थांमधील आंबट, खारट आणि मसाले हे फ्रिजमध्ये ठेवणे योग्य ठरते.

अंडे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी हे पदार्थ लवकर खराब होणारे आहेत. त्यामुळे हे पदार्थ नेहमी रेफ्रिजरेटमध्ये ठेवावेत. मात्र आठवड्याच्या आत या पदार्थांचे सेवन करावे. तज्ज्ञांनुसार फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांत २-३ दिवसात बॅक्टेरिया जमू लागतात. त्यामुळे अधिक काळ ठेऊ नये.

कोणतेही फळ कापल्यानंतर ६ ते ८ तासानंतर खाऊ नये. फ्रिजमध्ये शिजवून ठेवलेल्या भाज्या या २४ तासांच्या आत खाव्या अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जास्त झालेला भात तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्यास, दोन दिवसांच्या आत संपवावा. मळलेली कणीक फ्रिजमध्ये २४ तासांपेक्षा अधिक ठेऊ नये. यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊन कणीक आंबट होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी