या मोर्चात जिल्हाभरातून शेतकरी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. हा मोर्चा गोलक्लब मैदानापासून सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील कामगार व शेतकरी वर्गाच्या प्रलंबित मागण्या तसेच कामगार विरोधी भाजपप्रणीत मोदी सरकारने कामगार विरोधी चार श्रमसंहिता लागू केल्या असून त्या रद्द कराव्यात. दिल्ली येथील शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावे व एमपीसीचा कायदा मंजूर करावा. कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा, व २६ हजार रुपये किमान वेतन द्या.बंद कारखान्यातील कामगारांची देणी त्वरित द्या.
आशा कर्मचाऱ्यांचे शासनाने ठरवल्याप्रमाणे जीआर काढून मानधन वाढ द्यावी.या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या मोर्चास मार्गदर्शन कामगार कृती समिती व सीटुचे राष्ट्रिय उपाध्यक्ष कॉ डॉ. डी एल कराड तसेच कामगार कृती समितीचे नेते कॉ अरुण आहेर, कॉ राजू देसले, कॉ महादेव खुडे, कॉ मोहन देशपांडे, कॉ बाळासाहेब कासार, कॉ दिनेश वाघ, कॉ सिताराम ठोंबरे, देविदास आडोळे यांनी मार्गदर्शन केले.
विराट आक्रोश मोर्चाप्रसंगी कॉ श्यामसुंदर जोशी, कॉ आनंद गांगुर्डे, कॉ तानाजी जायभावे, कॉ सुनील मालुसरे, कॉ आप्पा वटाणे, सीटुचे जिल्हा अध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉ देविदास आडोळे, कॉ सचिन मालेगावकर, कॉ तुकाराम सोनजे, कॉ अरविंद शहापुरे, कॉ आत्माराम डावरे, कॉ संतोष काकडे, कॉ संतोष कुलकर्णी, कॉ मोहन जाधव, कॉ नागेश दुर्वे, कॉ राहुल गायकवाड, कॉ कल्पनाताई शिंदे, कॉ गौतम कोंगळे, कॉ सतीश खैरनार, कॉ दत्ता राक्षे, कॉ संजय पवार, कामगार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.