28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतला शेतकरी साहित्य संमेलनात जंगलवारीचा अनुभव

नाशिक अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतला शेतकरी साहित्य संमेलनात जंगलवारीचा अनुभव

अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर कंपनी येथे नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी शेतकरी साहित्य संमेलनात नाशिकचे वन्यजीव छायाचित्रकार अनंत(बाळा) सरोदे यांच्या जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी यावेळी केले. अभिनेते नाना पाटेकर यांनी छायाचित्र प्रदर्शनातील वन्यजीवांविषयी माहिती जाणून पक्षीमित्र अनंत (बाळा) सरोदे यांच्याकडून घेतली.नाशिकचे सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अनंत (बाळा) सरोदे यांचे आतापरंत कुसुमाग्रज स्मारक, पिंपळगाव कन्या विद्यालय, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव नाशिक, भोसला मिलिटरी कॉलेज, आयएमआरटी कॉलेज या ठिकाणी भरवलेल्या जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

मोहाडीच्या सह्याद्री फार्म येथील या पाचव्या जंगलवारी प्रदर्शनाला राज्यभरातील शेतकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या आफ्रिकेतील मसाई मारा जंगलातील आठवणीना उजाळा देत ताडोबातील वाघाने दुचाकीस्वारावर केलेल्या हल्ल्याची परिपूर्ण माहित घेत वन्यजीव छायाचित्रकार अनंत (बाळा) सरोदे यांचे जंगलवारीबद्दल कौतुक करत विशेष अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सह्याद्री फार्मचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी