33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपक्षाशी बेईमानी करणाऱ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ सिन्नरला सत्कार सोहळ्यात बडगुजर यांचा...

पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ सिन्नरला सत्कार सोहळ्यात बडगुजर यांचा गोडसेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून यावेळीसुद्धा येथून या गटाचा उमेदवार निवडून येईल ही काळ्या दगडावरची रेष आहे.पक्षाशी बेईमानी करणारे आता तोंड लपवत फिरत असून मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील,असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांचा नामोल्लेख न करता केला. सिन्नर तालुका शिवसेनेतर्फे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,लोकसभा संघटक विजय करंजकर आणी महानगरप्रमुख विलास शिंदे यांचा सत्कार सोहळा शनिवारी सकाळी माजी आमदार राजाभाऊ वाजे,आणि मान्यवरांच्या हस्ते सिन्नरच्या नर्मदा लॉन्स येथे पार पडला त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना बडगुजर बोलत होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून यावेळीसुद्धा येथून या गटाचा उमेदवार निवडून येईल ही काळ्या दगडावरची रेष आहे.पक्षाशी बेईमानी करणारे आता तोंड लपवत फिरत असून मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील,असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांचा नामोल्लेख न करता केला. सिन्नर तालुका शिवसेनेतर्फे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,लोकसभा संघटक विजय करंजकर आणी महानगरप्रमुख विलास शिंदे यांचा सत्कार सोहळा शनिवारी सकाळी माजी आमदार राजाभाऊ वाजे,आणि मान्यवरांच्या हस्ते सिन्नरच्या नर्मदा लॉन्स येथे पार पडला त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना बडगुजर बोलत होते.

2024ची लोकसभा निवडणूक म्हणजे मविआची आणि खास करून शिवसेना ठाकरे गटाची एक प्रकारे सत्वपरीक्षाच आहे.आपल्यासाठी एकेक जागा महत्त्वाची आहे.उद्धवजींनी अनेकांना मोठे केले. सक्षम उमेदवारांची मजबूत फळी असतानासुद्धा उद्धवजींनी ज्याच्यावर एकदा नव्हे तर दोनदा विश्वास टाकून निवडून आणले त्यानेच पक्षाशी गद्दारी केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट असून त्याला धडा शिकविण्याचा जणू निर्धारच त्यांनी केला आहे.त्यामुळे या उमेदवाराचे अवसानच गळाले असून आता तो मतांसाठी गयावया करतांना दिसत आहे,असा टोलाही बडगुजर यांनी लगावला.यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मविआतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी कंबर कसून कामाला लागावे,असे आवाहनही बडगुजर यांनी केले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचेच प्राबल्य आहे.अनेकांनी घाम गाळून नाशकात हा पक्ष वाढविला त्यापैकी मी एक आहे.जिल्हाच्या कानाकोपऱ्यात आज शिवसेनेच्या शाखा दिसतात याचे कारण लोकांचा उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर असलेली अपार श्रद्धा हेच आहे,असे लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी आपल्या मनोगतच सांगितले.मी पक्षातर्फे दोनदा उमेदवारी मागितली होती.माझी लढण्याची पूर्ण तयारी झाली होती.मात्र पक्षाने दिलेला आदेश पाळून मी दोनही वेळा थांबलो आणि पक्षाने ज्याला उमेदवारी दिली त्याचे निष्ठेने काम करून त्याला निवडून आणले.परंतु पक्षाशी गद्दारी करून तो भाजपाप्रणित युतीच्या दावणीला जाऊन बसला.पैशांसाठी तो अक्षरशः लाचार झाला.अशा उमेदवाराचे करायचे काय असा सवाल लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी आपल्या भाषणात करताच उपस्थितांमधून ‘खाली डोके वरती पाय’असे उत्तर आले आणि नंतर सुधाकर बडगुजर,विजय करंजकर,विलास शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी परिसर दणाणला होता.
सिन्नरमधून विजय करंजकर यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असा विश्वास माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला.पक्षातून बाहेर पडल्याने पक्ष अधिकच मजबूत झाला असून ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत.पक्षाची गद्दारी करणाऱ्यांना कार्यकर्ते पळता भुई थोडी करतील,असेही वाजे पुढे म्हणाले.प्रसंगी शिवसेना माजी आमदार राजा भाऊ वाजे,पदाधिकारी दीपक खुळे,देवानंद बिरारी,भारत कोकाटे,शशिकांत गाडे या मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आल.या वेळी सिन्नर तालुक्यातील नाशिक शहातील शिवसेना पदाधिकार निलेश शिंदे,गौरव घरटे,प्रवीण गडाख,किरण कोथमिरे,सोमनाथ तुपे, अरुण वाघ,पिराजी पवार,किरण डगळे, प्रकाश तुपे,रवी शेळके, पंकज मोरे,शैलेश नाईक,सुभाष जाधव, देव सांगळे बाळासाहेब कोकणे,ऋषी वर्मा,हे
अधिपदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी नासिक रोड वरून सिन्नर कडे निघालेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे चेहृडी गाव येथे युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे व त्यांचे सहकारी तसेच उपजिल्हाप्रमुख जगन राव अगळे .युवासेना
उपजिल्हा पदाधिकारी नवनाथ गायधनी त्यांचे सहकारी यांनी शिंदे पळसे गावात आणि शिंदे गावातील संजय तुंगार व त्यांच्या सहकारी यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांचे फटकड्याच्या अतिषभाजीत,ढोल ताषाच्या गजरात,गुलाल उधळत,जय घोष करीत स्वागत करण्यात आले.यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदी आणि उत्सवाचे वातावरण दिसून आले.
सिन्नर तालुक्यातील भगव्याच्या या झंजावात पाहता शिवाजीनगर मालवाडी येथील मारवाडी समाजातील वस्थानिक मंडळातील ग्रामपंचायत ग्रामस्य ज्ञानेश्वर आव्हाड, अनिल आव्हाड,लखन कांगणे,नाथा कांगणे, नंदू कांगणे,निशांत आव्हाड,निलेश आव्हाड,अंबादास आव्हाड,संतोष आव्हाड,गौरव आव्हाड,गोकुळ कराड, मुरली आव्हाड,शिवाजी आव्हाड ,उत्तम आव्हाड,यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी प्रवेश करत्यांना उद्देशून आपल्या विश्वासाला तडा जावू नदेता आपला शिवसेना पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल याची शास्वती दिली.या कार्यक्रमाप्रसंगी सिन्नर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी,व शिवसेना ग्रामस्थ तसेच तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी