28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबांधकाम मजूर/ घरेलू महिला कामगारांसाठी कामगार कल्याण विभागाकडून सुरू असणाऱ्या योजनेचा...

बांधकाम मजूर/ घरेलू महिला कामगारांसाठी कामगार कल्याण विभागाकडून सुरू असणाऱ्या योजनेचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी मिळावा देवयानी फरांदे

राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाकडून बांधकाम मजूर/ घरेलू महिला कामगारांना घरेलू उपयोगासाठी भांडे देण्याची योजना आहे. शासनाच्या या योजनेचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक मोफत फॉर्म देण्यासाठी एक हजार रुपये मागणी करीत आहेत. आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघातील विविध कार्यकर्त्यांनी कडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. आमदार देवयानी फरांदे यांनी तत्काळ या कार्यकर्त्यांची बैठक बोलून कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त श्री विकास माळी यांच्याशी संपर्क करून त्यांच्या समवेत कार्यकर्त्यांची बैठक घडवून आणली.

यावेळी कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त विकास माळी यांनी राज्य शासनाच्या निधीतून सुरू असणारी सदर योजना ही पूर्णतः मोफत असून यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे कोणत्याही व्यक्तीला देणे बेकायदेशीर असल्याचे सांगतानाच या प्रकारच्या घटना होत असेल तर याबाबत तक्रारी कामगार कल्याण विभागाकडे करण्याची विनंती देखील केली.

आमदार देवयानी फरांदे यांनी देखील त्यांच्या कार्यालयातून सदर योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करताना याबाबत आवश्यक तेवढे फॉर्मस त्यांच्या कार्यालयात उपलब्ध करून घेणार असून बांधकाम मजूर/ घरेलू महिला कामगारांसाठी ते मोफत उपलब्ध होणार आहे. आगामी काळात आपण देखील विविध झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन बांधकाम मजूर/ घरेलू महिला कामगारांना या योजनेचा फायदा जास्तीत जास्त प्रमाणात मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बांधकाम मजूर/ घरेलू महिला कामगार यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केलेले आहे. ,

या बैठकीला माजी नगरसेवक स्वातीताई भामरे, अर्चना थोरात रुपाली निकुळे, संध्या कुलकर्णी रोहिणी नायडू, सोनल दगडे संगीता जाधव मीनल भोसले अमोल गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे, प्रतीक शुक्ल प्रसाद धोपवकर आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी