28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रश्रीकाळारामांना तब्बल ३२ हात पांढराशुभ्र फेटा !

श्रीकाळारामांना तब्बल ३२ हात पांढराशुभ्र फेटा !

देवकलाह्लास निवृत्ती पूर्वक देवकला अभिवृद्धीसाठी देवतांच्या मस्तकावर पट्टबन्ध बांधने याला पाटोस्तव असे प्रतिष्ठामहोददी व प्रतिष्ठामौक्तिकम् या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. तसेच देवाला गरम होऊ नये यासाठी देखील शुभ्र वस्त्राचा वापर करण्यात येतो. नाशिकच्या श्रीकाळारामाला < Shrikalaram temple > आमलकी एकादशीच्या दिवशी पांढरा शुभ्र फेटा बांधण्याची परंपरा असून रंगपंचमीला पुजारी घराण्यातील २७ व्या पिढीतील आणि यावर्षीचे मानकरी असलेल्या राघवेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीकाळारामाच्या मूर्तींना रंग लावून रंगपंचमी सुरु करण्याची परंपरा चालत आलेली आहे. ३२ ही संख्या अनुष्टुप छंदाचे रुप आहे. वेदातील पुरुषसुक्त रामरक्षा पवमानसुक्तांतील बहुतांशी ऋचा याच छंदात आल्या आहे. चार वेदातील स्तुती मंत्र अनुष्टुपछंदात आहे. या छंदातील स्तुतीने प्राणरुपी देवता प्रसन्न होतात म्हणून देवतांना देखील या छंदातील स्तुती आवडते. फेटा नेसवायच्या आधी रामरायाला १६ पुरुषसुक्ताव्दारे महापुजा संपन्न करण्यात येते. त्यानंतर विधीपूर्वक प्रथम श्वेत वस्त्राचा झगा पोशाख, सितादेवी यांना साडी चोळी नेसवुन त्यांनतर श्रीकाळारामाना प्रथम फेटा बांधायला सुरवात करण्यात येते त्यानंतर बंधू लक्ष्मणाला फेटा बांधण्यात येतो.< Beat Shrikalaram with 32 hands white and white >
बुधवार दि. २० आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी रामरायाला शुभ्र फेटा बांधण्यात आला. या सर्व कार्याला तब्बल दोन तास लागतात. ही परंपरा पुजारी घराण्यातील २७ पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने अखंड सुरु आहे. श्वेत वस्त्रातील रामरायाचे दर्शन मोठे पुण्यकारक सांगितले आहे. येरवी अकरा महिन्यातील सर्व एकादशींना श्रीकाळारामांच्या मूर्तीना पितांबर नेसवलेले असते फक्त फाल्गुन मासातच हे पांढरे वस्त्र उन्हाळ्याच्या त्रास होऊ नये म्हणून घालण्यात येत असते. श्री काळारामाच्या मूर्तींसोबत उत्सव मूर्तीना देखील पांढरे वस्त्र घालण्यात येते. श्रीकाळारामांच्या मूर्तीना पितांबर नेसवलेले असते फक्त फाल्गुन मासातच हे पांढरे वस्त्र उन्हाळ्याच्या त्रास होऊ नये म्हणून घालण्यात येत असते. श्री काळारामाच्या मूर्तींसोबत उत्सव मूर्तीना देखील पांढरे वस्त्र घालण्यात येते.
यावेळी सचिन पुजारी यांनी महापुजा संपन्न केली. तर विश्वस्त धनंजय पुजारी, श्री महंत सुधीरदास महाराज विश्वस्त शुभम मंत्री देवेंद्र पुजारी, सुनील पुजारी दिपक कुलकर्णी यांनी फेटा बांधला. शनिवार दि. ३० रोजी रंगपंचमीच्या दिवशी केशर व पळसाच्या फुलांचा रंग उकळून त्याचा रंग यावर्षीचे उत्सवाचे मानकरी राघवेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते श्रींना श्रीखंडाचा नैवद्य दाखवून त्यांच्या श्वेत रंगाच्या वस्त्रावर रंग व गुलाल टाकण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिककरांची रहाड रंगपंचमी सुरु करण्याची परंपंरा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी