30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरात पाणीटंचाई : ५० टँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक शहरात पाणीटंचाई : ५० टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्हातील अनेक गावात पाणीटंचाई < Water tanker >च्या झळा बसत असताना नाशिक महापालिका हद्दीत देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराचा विस्तार वाढला, घरे वाढली मात्र त्या प्रमाणात जलकुंभ क्षमता वाढली नाही त्यामुळे शहरात सध्या मनपाचे आठ टँकर ५० फेरी मारत पाणीपुरवठा करीत आहेत. दुसरीकडे गंगापूर धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी जायकवाडीसाठी गंगापूर व दारणा समूहातून एकूण तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाशिक महापालिकेने मागणी केलेले ६१०० दलघफू पाणी आरक्षण जलसंपदाने फेटाळत ५३०० दलघफू पाणी मंजूर केले.मात्र धरणाची पातळी ५९८ मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागेल. अन्यथा मृतसाठ्यातील पाणी उचलता येणार नाही व शहरात पाणी कपातीचा कटू निर्णय घ्यावा लागू शकतो.< nashik Water scarcity,50 tankers supply water >

३१ जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागवायची असेल तर ५८०० दलघफू पाणी आवश्यकता आहे. अन्यथा शहरात पाणी कपात लागू करावी लागेल.यावर तोडगा म्हणून जलसंपदाने मृतसाठ्यातील सहाशे दलघफू पाणी उचलण्याची परवानगी दिली. मात्र धरणाची पातळी ५९८ मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागेल. अन्यथा मृतसाठ्यातील पाणी उचलता येणार नाही व शहरात पाणी कपातीचा कटू निर्णय घ्यावा लागू शकतो. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या विषयाला आता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची परवानगी घावी लागणार आहे.
अनेक ठिकाणी होतोय अपव्यय पण यंत्रणा नाही .
पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील जुने नाशिक, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर, कामटवाडे भागातील रहिवासी भागातील बंगले, मंगल कार्यालये, लॉन्स येथे रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी केली जात आहे.तर नागरिक देखील मनपाच्या नाकावर टिचुन वाहने धुणे किंवा अंगणात सडा घालणे यातून पाणी वाया घालत आहे ,मात्र हे रोखण्यासाठी मनपाकडे कोणतीही यंत्रणा नाही.

शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेचे आठ टँकर मागणी नुसार पाणी पुरवठा करत आहेत. सध्या एक टँकर सुमारे पाच ते सहा फेऱ्या मारत असून ५० फेऱ्या होत असल्या तरी पुढील कालावधीत यामध्ये वाढ होउ शकते.
संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी