29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाची वाहने जिल्हा प्रशासनाला देण्यास नकार

नाशिक मनपाची वाहने जिल्हा प्रशासनाला देण्यास नकार

ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी व इच्छुकांकडून सुरू आहे, तशीच जोरदार तयारी प्रशासनाच्या वतीने देखील सुरू आहे. निवडणुका घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असल्यामुळे त्यांनी मनुष्यबळासह वाहने गोळा करण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात येत आहे. दरम्यान नाशिक महापालिकेच्या सुमारे 22 एअर कंडिशन गाड्यांची मागणी प्रशासनाने केल्याचे समजते. मात्र महापालिकेच्या अधिकार्‍यांना हे गाड्या वापरण्यासाठी लागत असल्यामुळे महापालिका वाहने देणार नसल्याचे समजते.लोकसभा निवडणूक म्हटल्यावर प्रशासनाला मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागते, त्यासाठी बुथ स्तरावरून तर निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका त्याचप्रमाणे निवडणूक यंत्र घेण्यासाठी व पोचवण्यासाठी बसेस तसेच पोलीस बंदोबस्त आदींचे नियोजन करावे लागते.

ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी व इच्छुकांकडून सुरू आहे, तशीच जोरदार तयारी प्रशासनाच्या वतीने देखील सुरू आहे. निवडणुका घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असल्यामुळे त्यांनी मनुष्यबळासह वाहने गोळा करण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात येत आहे. दरम्यान नाशिक महापालिकेच्या सुमारे 22 एअर कंडिशन गाड्यांची मागणी प्रशासनाने केल्याचे समजते. मात्र महापालिकेच्या अधिकार्‍यांना हे गाड्या वापरण्यासाठी लागत असल्यामुळे महापालिका वाहने देणार नसल्याचे समजते.

लोकसभा निवडणूक म्हटल्यावर प्रशासनाला मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागते, त्यासाठी बुथ स्तरावरून तर निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका त्याचप्रमाणे निवडणूक यंत्र घेण्यासाठी व पोचवण्यासाठी बसेस तसेच पोलीस बंदोबस्त आदींचे नियोजन करावे लागते. यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून मनुष्यबळ व वाहनांची सुविधा घेण्यात येते. त्याचा एक भाग म्हणून नाशिक महापालिकेतील 22 मोठ्या एअर कंडिशन गाड्यांची माहिती जिल्हा प्रशासनाने मागीतली असून त्या ताब्यात घेण्यात येणार असल्याचे समजते. मात्र मनपाची वाहने मनपाच्या अतिरीक्त आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी अशांना नियमीत लागातात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाहने जरी मागीतली तरी त्या देण्याची तयारी मनपाची नसल्याचे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी