28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक सातपूरला दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल

नाशिक सातपूरला दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल

परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चोरी करत सातपूर पोलिसांसमोर आव्हान उभ्या करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात आला असून त्यांच्याकडून अनुक्रमे सहा लाख 92 हजार व दोन लाख असा एकूण ८ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.पहिल्या घटनेत सातपूर परिसरातील लालजी मुलगी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊन मधून 18 फेब्रुवारीकॅब्या रात्री नऊ लाख 44 हजार 317 रुपये किमतीचे कॉपर धातूचे रॉड चोरीस गेले होते.

परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चोरी करत सातपूर पोलिसांसमोर आव्हान उभ्या करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात आला असून त्यांच्याकडून अनुक्रमे सहा लाख 92 हजार व दोन लाख असा एकूण ८ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.पहिल्या घटनेत सातपूर परिसरातील लालजी मुलगी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊन मधून 18 फेब्रुवारीकॅब्या रात्री नऊ लाख 44 हजार 317 रुपये किमतीचे कॉपर धातूचे रॉड चोरीस गेले होते. सातपूर पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करत संयशीत आरोपी मनीष मदन सिंग (वय 19), आदित्य उर्फ दीपक गजानन लोट (वय २०), महेंद्र देवसिंग बागुल (वय 23), अभिषेक बाबासाहेब सोनवणे (वय 19 ) सर्व राहणार अंबड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत अशोक नगर विश्वास नगर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात बुधवारी (दि. २१) चाेरट्यांनी धाडसी चाेरी करत महादेवाचा १३ किलाे वजनाचा पितळी मुखवटा, ७ किलाे वजनाचा देवीचा पितळी मुखवटा, ११ किलाे वजनाचे शिवलिंग कवच, त्रिशुल व तांब्याचा नाग व दान पेटीतील राेकडवर डल्ला मारला होता. यातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेच्या आधारे शोध घेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बीजे पिंपरी हिरडी रोहिले गाव पिंजून काढली. अखेर संशयित रोशन भगवान भाडमुखे (वय 21 वर्षे राहणार पिंपरी), प्रताप दत्तू वाघ वय 24 वर्ष व सुनील जयराम महाले वय वीस वर्ष राहणार हिरडी यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहा.पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पो. ह.अनिल आहेर, दीपक खरपडे पोलीस, सागर गुंजाळ, विलास गिते, सचिन आजबे यांनी कामगिरी फत्ते केली.

दरम्यान, नीलकंठेश्वर मंदिरातील पंचधातूचे कवच असलेली पिंड व इतर साहित्य शिवरात्रीपूर्वी मिळावी अशी साद पुजार्यांसाहा भक्तांनी पोलिसांना घातली होती. शिवरात्रीच्या पंधरा दिवस अगोदरच गुन्ह्याची उकल करत भगवान शिवशंकर भक्तांवर प्रसन्न झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात उमटत होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी