31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मध्ये कुसुमाग्रज यांच्या कवितांची हेळसांड

नाशिक मध्ये कुसुमाग्रज यांच्या कवितांची हेळसांड

मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी मनपाच्या कुसुमाग्रज उद्यानात साफसफाई करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे उद्यानात याठिकाणी मराठी कविता असलेल्या कोनशिला तुटलेल्या अवस्थेत तर काही कविता असलेल्या कोनशिला गायब झाल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मनपा प्रशासनाचे मराठीवरील बेगडी प्रेम दिसून येत असल्याच्या भावना येथे आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.

मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी मनपाच्या कुसुमाग्रज उद्यानात साफसफाई करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे उद्यानात याठिकाणी मराठी कविता असलेल्या कोनशिला तुटलेल्या अवस्थेत तर काही कविता असलेल्या कोनशिला गायब झाल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मनपा प्रशासनाचे मराठीवरील बेगडी प्रेम दिसून येत असल्याच्या भावना येथे आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१३ साली घेतला होता.

नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने पंचवटी परिसरातील मोरेमळा परिसरात २००१ साली कवी कुसुमाग्रज उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. या उद्यानात ठिकठिकाणी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे शिलालेख लावण्यात आले होते. मात्र, कालांतराने मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आणि या उद्यानाची वाताहत झाली होती. तीन ते चार वर्षांपूर्वी जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करून या उद्यानाला झळाळी देण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, पैसे खर्च करून देखील याठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या उद्यानाचा ताबा मद्यपी आणि टवाळखोरांनी घेतल्याने याकडे नाशिककरांनी पाठ फिरवली आहे.

मंगळवार दि. २७ रोजी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असल्याने या उद्यानात मनपाचे सफाई कर्मचारी साफसफाई करताना दिसून आले. वाढलेले गवत काढून साचलेला पालापाचोळा आणि कचरा उचलून घेण्यात आल्याने उद्यान चकाचक दिसत होते. मात्र, दुसरीकडे कवी कुसुमाग्रज यांच्या कविता असलेल्या कोनशिला चोरीला आणि काही कोनशिला तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने या ठिकाणी आलेल्या नाशिककरांनी मनपाच्या उदासीनतेबाबत आपली नाराजी व्यक्त केली. किमान मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून तरी याठिकाणी असलेल्या मराठी कवितांच्या कोनशिला पुन्हा उभारण्यात याव्या आणि उद्यानात सुरक्षारक्षकाची नेमणूक करून सुरक्षित असे हे भव्य उद्यान खुले करावे अशीही मागणी अनेकांकडून केली जात आहे.

कुसुमाग्रज उद्यानाला गोदावरी नदीच्या बाजूने लोखंडी जाळ्यांचे संरक्षित कठडे उभारण्यात आले होते. मात्र, मनपाच्या आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे उद्यानातील एका कोपऱ्यातील संरक्षक जाळ्या आणि लेखणी पोल भुरट्या चोरांनी चोरून नेल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक मद्यपी या उद्यानातून गोदावरी नदीच्या किनारी दारू पिण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी