32 C
Mumbai
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक सिटी लिंक बसला सातव्यांदा ‘ब्रेक’

नाशिक सिटी लिंक बसला सातव्यांदा ‘ब्रेक’

नाशिक शहरासह लगतच्या गावांमधील प्रवाशांसाठी वरदान ठरलेली मनपाची सिटी लिंक बससेवा गुरूवारी (दि. २९) पुन्हा ठप्प झाल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांचे हाल झाले अाहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या सिटी लिंक बस ठेकेदाराने चालक, वाहकांचे गेल्या तीन ते चार महिन्यांचे वेतन थकविल्याने पहाटेपासूनच बस सेवा बंद करण्यात अाली.सिटीलिंक बसच्या ठेकेदाराकडून यापूर्वी देखील चालक वाहकांचे वेतन रोखले गेल्याने चालक आणि वाहकांनी संप पुकारला होता विशेष म्हणजे आत्ता पर्यंत जवळपास वेतन रखडविल्याच्या कारणावरून पुकारलेला सातवा बंद असून, सातत्याने हाेत असलेल्या संपामुळे महापालिकेने मध्यंतरी एका ठेकेदाराएेवजी दुसरा ठेकेदार नेमला अाहे.

नाशिक शहरासह लगतच्या गावांमधील प्रवाशांसाठी वरदान ठरलेली मनपाची सिटी लिंक बससेवा गुरूवारी (दि. २९) पुन्हा ठप्प झाल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांचे हाल झाले अाहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या सिटी लिंक बस ठेकेदाराने चालक, वाहकांचे गेल्या तीन ते चार महिन्यांचे वेतन थकविल्याने पहाटेपासूनच बस सेवा बंद करण्यात अाली.

सिटीलिंक बसच्या ठेकेदाराकडून यापूर्वी देखील चालक वाहकांचे वेतन रोखले गेल्याने चालक आणि वाहकांनी संप पुकारला होता विशेष म्हणजे आत्ता पर्यंत जवळपास वेतन रखडविल्याच्या कारणावरून पुकारलेला सातवा बंद असून, सातत्याने हाेत असलेल्या संपामुळे महापालिकेने मध्यंतरी एका ठेकेदाराएेवजी दुसरा ठेकेदार नेमला अाहे. सिटीलिंगच्या बस वाहक व चालकांनी दोन दिवसांपूर्वीच रखडलेले वेतन वेळेत द्यावे अशी मागणी सिटीलींक प्रशासन व ठेकेदाराकडे केली होती मात्र राजकीय वरद हस्त असलेल्या त्या संबंधित ठेकेदाराने पुन्हा पहिले पाढे गिरवत वाहक आणि चालकांचे वेतन रखडविल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत सिटीलींक बस सेवा बंद पाडली. गुरुवारी पहाटेपासूनच बस फेऱ्या बंद असल्याने नाशिक शहरातील रस्त्यावर एकही सिटी लिंक धावलेली नव्हती. सिटी लिंक बस सेवा बंद असल्याने दैनंदिन सकाळी शाळेत तसेच कामावर शेकडो जाणाऱ्या कामगारांची गैरसोय झाली होती त्यामुळे अनेकांना इच्छितस्थळी जाण्यासाठी दुचाकी तसेच रिक्षाने प्रवास करावा लागल्याचे चित्र दिसून आले.

दिवाळीच्या बोनसची अद्याप प्रतीक्षा
या कर्मचारर्यांना दिवाळीचा बोनसही अद्याप मिळालेला नाही . दिवाळी होऊन चार महिने उलटाले असले तरी अद्याप बोनस मिळाला नाही . या मागणीसाठी यापूर्वी वारंवार संप झाला आहे मात्र ठेकेदाराला कोणताही फरक पडत नाही असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सिटीलिंकचे अधिकारी नॉट रिचेबल
या स वारंवार होणाऱ्या संपाबाबत सिटिलीकी महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांच्याशी संप्रर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत तर याबाबत मनपाचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी यांनी ठेकेदाराशी मनपा अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून लवकरात लवकर वेतांना द्यावे असे आदेश दिल्याचे सांगितले.

ठेकेदाराला अभय कोणाचे
सिटीलिंक ठेकदारांमुळे वारंवार महापालिका आणि प्रवाशाना देखील त्रास होत आहे. आज झालेला संप हा सातव्यांदा झालेला आहे त्यामुळे असे असले तरी मनपा आयुक्त या ठेकेदाराला का अभय देतात . त्यावर कठोर कार्यवाही का करत नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी