33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक अखेर सिटीलिंकचा संप मिटला

नाशिक अखेर सिटीलिंकचा संप मिटला

सिटीलिंकच्या तपोवन डेपो येथील वाहकांनी गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी पहाटे पासून पुकारलेला संप शुक्रवारी रात्री उशिरा महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर मागे घेतला आहे. संप मागे घेण्यात आल्याने आता रात्रपाळीच्या बसेस पंचवटीतील तपोवन डेपो येथून विविध मार्गांना मार्गस्थ झाल्या आहे. व शनिवार पासून नियोजित वेळेप्रमाणे टप्प्याटप्प्याने सर्वच बसेस मार्गस्थ होणार आहे. तसेच अचानक वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक प्रवाश्यांची गैरसोय झाली त्यामुळे सिटीलिंक प्रशासन प्रवाशांचे दिलगीर हि व्यक्त केली आहे. तरी बसेस नियमित सुरू झाल्याने प्रवाश्यांनी बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि.च्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान, तपोवन बस डेपोतील वाहकांच्या संपामुळे सिटीलिंकच्या सुमारे १५० बस या डेपोतून बाहेरच न पडल्याने प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला, नाशिकरोड डेपोतील शंभर बसची सेवा सुरू असली, तरी या स्थानकातून नेहमी सुटणाऱ्या बसची संख्या घटल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. गुरुवारी ठेकेदार, वाहक आणि सिटीलिंकमध्ये तोडगा न निघाल्यान शुक्रवारी रात्री पर्यंत हा संप सुरूच होता. यामुळे शहरातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.

ठेकेदाराचा ठेक्का रद्द होणार..

महापालिकेने वेतनासाठी डिसेंबरचे आगाऊ देयक अदा करूनही ठेकेदाराने वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन थकवल्याने सिटीलिंकच्या तपोवन डेपोतील वाहकांनी गुरुवारी अचानक संप पुकारला आहे. सिटीलिंक बससेवा सुरू झाल्यापासून साडेतीन वर्षांमध्ये आतापर्यंतचा हा आठवा संप असल्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने अखेर ‘मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटीज’ या दिल्लीस्थित ठेकेदार कंपनीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी तिसरी व अंतिम नोटीस पाठवली आहे. यामुळे या वाहक पुरवत असलेल्या ठेकेदाराचा ठेक्का रद्द होणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी