26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यात समन्वय अधिकारी

नाशिकमध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यात समन्वय अधिकारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून त्यासाठी पोलिस ठाणेनिहाय समन्वयक अधिकाऱ्याची नेमणूक केली जात आहे. सराईत गुन्हेगारांसह समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्यात येणार आहे. जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालून निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.निवडणूकीत कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित केल्या आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत यांनी त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून त्यासाठी पोलिस ठाणेनिहाय समन्वयक अधिकाऱ्याची नेमणूक केली जात आहे. सराईत गुन्हेगारांसह समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्यात येणार आहे. जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालून निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.निवडणूकीत कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित केल्या आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत यांनी त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्याच्या सुचना दिल्या आहेत. सहायक पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची पथके त्यादृष्टीने कामकाज करीत आहेत. यासह गुन्हे शोध पथकांना सराइतांची धरपकड करण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगार सक्रीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह परजिल्हा, परराज्यातील संशयितही शहरात येण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील पोलिस ठाणेनिहाय प्रतिबंधात्मक कारवाईकरीता समन्वयक अधिकारी नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षक हे समन्वयक असतील. त्यांचे पथक संशयितांवर नजर ठेवण्यासह हद्दपारी, एमपीडीए, मोक्कांतर्गत कारवाई प्रस्तावित करतील. बीट मार्शल देखील हद्दीत संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करतील. तसेच सराईत गुन्हेगारांविरोधात उपआयुक्त व सहायक पोलिस आयुक्त कार्यालयामार्फत कारवाई प्रस्तावित होण्याची चिन्हे आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी