28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपा अंदाजपत्रकासाठी तारीख पे तारीख

नाशिक मनपा अंदाजपत्रकासाठी तारीख पे तारीख

सुट्टीच्या दिवशी मनपा आयुक्तांनी महानगरपालिकेच्या सन २०२४-२५ चे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी बैठक घेतली.मात्र अद्यापही अंदाज पत्रक सादरीकरणासाठी मुहूर्त लागत नसल्याने मनपा अंदाज पत्रकासाठी तारीख पे तारीख सुरू असल्याचे दिसते.जानेवारी महिन्यात आयुक्त तथा प्रशासनाधिकारी डॉ. अशोक करंजकर व मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली होती . आगामी लोकसभा निवडनुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिका प्रशासन नाशिककरांसाठीचे अंदाजपत्रक सादर करणार आहे. यावेळी बहूतेक विभागांचा आढावा पूर्ण झाला असला तरी काही विभागांना पुन्हा सुचना देण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता गृहीत धरून त्यापूर्वीच अंदाजपत्रक मंजुरी करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

सभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने २०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी पालिका प्रशासनाची हालचाल सुरू केली आहे. मागील वर्षी दोन हजार ४७७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. यावर्षी हा आकडा कितीपर्यंत पाेहाचतो याकडे लक्ष लागून आहे.

करंजकर यांचे पहिलेच अंदाजपत्रक

महानगरपालिकेकडून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर केले जाते. पालिका प्रशासनाकडून नाशिककरांवर वाढीव पाणीपट्टी लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राजकीय विरोधामुळे प्रशासनाला दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. यापूर्वी २०२३-२४ चे अंदाजपत्रक तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादर केले होते. त्या बजेटमध्ये कुठलीही दरवाढ नाशिककरांवा लादली गेली नव्हती. त्याचप्रमाणे करंजकर यांचेकडून अदाजपत्रक सादर केले जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत सादर होणारे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांचे पहिलेच असणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी या अंदाजपत्रकातून नाशिककरांना काय मिळ्णार याकडे सर्वाच्या नजरा असेल.

आगामी अंदाजपत्रकासाठी सुटीच्या दिवशीही बैठक

विभागप्रमुखांना आयुक्तांकडून सुचना
महानगरपालिकेच्या सन २०२४-२५ चे अंदाजपत्रक तयार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून शनिवारी आयुक्त तथा प्रशासनाधिकारी डॉ. अशोक करंजकर व मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. आगामी लोकसभा निवडनुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिका प्रशासन नाशिककरांसाठीचे अंदाजपत्रक सादर करणार आहे. यावेळी बहूतेक विभागांचा आढावा पूर्ण झाला असला तरी काही विभागांना पुन्हा सुचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता गृहीत धरून त्यापूर्वीच अंदाजपत्रक मंजुरी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने २०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी पालिका प्रशासनाची हालचाल सुरू केली आहे. मागील वर्षी दोन हजार ४७७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. यावर्षी हा आकडा कितीपर्यंत पाेहाचतो याकडे लक्ष लागून आहे. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत कामांची यादी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु नगर नियोजन, मिळकत व बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास विलंब झाला. त्यामुळे जानेवारी महिन्यात सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याची वेळ लेखाविभागावर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठका तर दुसरीकडे अंदाजपत्रक सादर करावे लागणार असल्याने व त्यातही लोकसभा निवडणुकीचे आचार संहिता लागू झाल्यास तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने २० फेब्रुवारीच्या आत अंदाजपत्रक मंजूर करण्याची घाई सुरू आहे. त्यामुळेच शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावली होती.

करंजकर यांचे पहिलेच अंदाजपत्रक

महानगरपालिकेकडून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर केले जाते. पालिका प्रशासनाकडून नाशिककरांवर वाढीव पाणीपट्टी लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राजकीय विरोधामुळे प्रशासनाला दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. यापूर्वी २०२३-२४ चे अंदाजपत्रक तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादर केले होते. त्या बजेटमध्ये कुठलीही दरवाढ नाशिककरांवा लादली गेली नव्हती. त्याचप्रमाणे करंजकर यांचेकडून अदाजपत्रक सादर केले जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत सादर होणारे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांचे पहिलेच असणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी या अंदाजपत्रकातून नाशिककरांना काय मिळ्णार याकडे सर्वाच्या नजरा असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी