28 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये शिवसेनेचे मनपा आयुक्तांना साकडे

नाशिकमध्ये शिवसेनेचे मनपा आयुक्तांना साकडे

महानगरपालिका परिसरातील प्रभाग क्रमांक २३ मधील विनय नगर, दिपाली नगर परिसरतील नागरिकांनी नाशिक मनपा आयुक्त यांना परिसरातील समस्या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, नाशिक जिल्हा संघटक योगेश म्हस्के यांनी निवेदन दिले असून याबाबत लवकरच काम सुरु करणार असल्याचे आयुक्तांनी मान्य देखील केले आहे.या प्रसंगी कमलाकर मोहिते, तुषार मुथे, किशोर रोकडे, विजय विभांडिक, शैलेन्द्र दुसाने, एस. बी. चव्हाण, पिराजी गायकवाड, पी. बी. पाटील, सुभाष पावटेकर, शेख काका, सचिन विभांडिक, राकेश परदेशी, चेतन सोनवणे, दाणी काका आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महानगरपालिका परिसरातील प्रभाग क्रमांक २३ मधील विनय नगर, दिपाली नगर परिसरतील नागरिकांनी
नाशिक मनपा आयुक्त यांना परिसरातील समस्या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, नाशिक जिल्हा संघटक योगेश म्हस्के यांनी निवेदन दिले असून याबाबत लवकरच काम सुरु करणार असल्याचे आयुक्तांनी मान्य देखील केले आहे.या प्रसंगी कमलाकर मोहिते, तुषार मुथे, किशोर रोकडे, विजय विभांडिक, शैलेन्द्र दुसाने, एस. बी. चव्हाण, पिराजी गायकवाड, पी. बी. पाटील, सुभाष पावटेकर, शेख काका, सचिन विभांडिक, राकेश परदेशी, चेतन सोनवणे, दाणी काका आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या निवेदनात प्रभाग क्रमांक २३ मधील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील म.न.पा. च्या मोकळ्या भूखंडात रात्री अंधार असतो त्याठिकाणी इतर परिसरातील नागरिक व स्थानिक नागरिक मुले अंधारात मद्यपान करतात तसेच इतरही अनैतिक कामे करतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रात्री शतपावली सुद्धा करता येत नाही. त्यामुळे सदर जागेवर मध्यभागी हायमास्ट बसविण्यात यावा, म.न.पा.च्या खुल्या जागेत लहान बालकांसाठी नवीन खेळणी बसविण्यात यावी, हॉलीबॉल मैदान तयार करण्यात यावे, मंदिराच्या सभा मंडपात म.न.पा. अंगणवाडी चालते, लहान बालके खुल्या जागेत नैसर्गिक विधी करतात तरी सदर अंगणवाडी खुल्या जागेत इमारत बांधण्यात यावी.

या मंदिर परिसरात वारंवार ड्रेनेज तुंबते, नवीन इमारती तयार होत आहे म्हणून हा त्रास जास्त प्रमाणात वाढेल आहे. नवीन विकासक इमारती परिसराचे उतार डांबरी रस्त्यापर्यंत करतात त्यामुळे पायी व दुचाकी चालवणे मुश्किल झाले आहे, तरी टी पॉइंटचे चेंबर मोठे करणे व ड्रेनेज लाईन योग्य ते बदल करून, रस्ता मोकळा करण्यात यावा.

सर्विस रोड ते वडाळा पावडीं पर्यंतचा दिपाली नगर विनय नगर संत नामदेव महाराज पथ या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पायी चालण्यासाठी दुतर्फा पेवर ब्लॉक बसविण्यास यावे तसेच गणपती मंदिर परिसरातील व्यायाम शाळा अतिशय जुनी व जीर्ण झाली असून परिसरातील युवकांना तेथे व्यायाम करणे शक्य होत नाही त्यासाठी सदरील जुनी व्यायाम शाळा पाहून नवीन बांधून देण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी सर्व समस्यांवर लवकरच काम करणार असून श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती अगोदर सदर जागेवर मध्यभागी हायमास्ट बसविला जाईल असे आश्वासन दिले असून या संदर्भातील पाठपुरावा शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश म्हस्के करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी