28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयेवल्यातील गंगासागर तलावाचे ४ कोटी ९६ लाखांच्या निधीतून होणार पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण

येवल्यातील गंगासागर तलावाचे ४ कोटी ९६ लाखांच्या निधीतून होणार पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरातील गंगासागर तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी अमृत दोन योजनेअंतर्गत ४ कोटी ९६ लाखांच्या प्रकल्पास मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार येवला शहरातील गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासोबत परिसरात हरित क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. तसेच परिसराचे सौंदर्यीकरण करून येथे रस्ता व जॉगिंग ट्रॅक देखील विकसित करण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. सन २०१५ पासून राज्यात अमृत १ योजना कार्यान्वित होती. मात्र ही योजना राज्यातील मोजक्याच शहरांपूर्ती मर्यादित होती.

आता दुसऱ्या टप्प्यात या योजनेत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शहरातील घरांना नळ जोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत शंभर टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्त्रोत पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरीत क्षेत्र विकसीत करणे, मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे आदी प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

या अमृत दोन योजनेअंतर्गत येवला शहरातील गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करून याठिकाणी सौंदर्यीकरण करण्यासाठी येवला नगरपलिकेकडून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्याधिकाऱ्याना केलेल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव शासन सादर करण्यात आला होता. यासाठी छगन भुजबळ यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या प्रस्तावास शासनाकडून मंजूरी मिळाली असून गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करून याठिकाणी सौंदर्यीकरण करण्याच्या ४ कोटी ९६ लाखांचा प्रकल्प शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. या मध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के हिस्सा, राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा तर नगरपालिकेचा १० टक्के हिस्सा असणार आहे.

या निधीतून गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करून या परिसरात हरित क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. तसेच परिसराचे सौंदर्यीकरण करून येथे रस्ता व जॉगिंग ट्रॅक देखील विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे येवल्याच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी