28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपात पसंतीच्या विभागासाठी दोघा उप अभियत्यांची सेटींग

नाशिक मनपात पसंतीच्या विभागासाठी दोघा उप अभियत्यांची सेटींग

महापालिकेतील बांधकाम विभागावरील पदोन्नतीवरील स्थगिती उठवल्यानंतर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणाऱ्या दोघा उप अभियंत्यांची कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळ्णार आहे. हे दोन्ही उप अभियंते सध्या वेगवेगळ्या विभागात आहे. मात्र त्यांना कार्यकारी अभियंता पद मिळाल्यावर ही सध्या असलेल्या विभागाचीच जबाबदारी मिळावी. याकरिता प्रयत्नात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.महापालिकेत घनकचरा, आरोग्य सह विविध विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती दिली जात आहे. परंतु बांधकाम (स्थापत्य) च्या पदोन्नती स्थगितीमुळे बाजुला ठेवली होती. स्थगिती उठवल्यानंतर पदोन्नती समिती लवकरच निवड जाहीर करणार आहे.

महापालिकेतील बांधकाम विभागावरील पदोन्नतीवरील स्थगिती उठवल्यानंतर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणाऱ्या दोघा उप अभियंत्यांची कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळ्णार आहे. हे दोन्ही उप अभियंते सध्या वेगवेगळ्या विभागात आहे. मात्र त्यांना कार्यकारी अभियंता पद मिळाल्यावर ही सध्या असलेल्या विभागाचीच जबाबदारी मिळावी. याकरिता प्रयत्नात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेत घनकचरा, आरोग्य सह विविध विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती दिली जात आहे. परंतु बांधकाम (स्थापत्य) च्या पदोन्नती स्थगितीमुळे बाजुला ठेवली होती. स्थगिती उठवल्यानंतर पदोन्नती समिती लवकरच निवड जाहीर करणार आहे.
दरम्यान शहरातील वेगवेगळ्या विभागात काही वर्षापासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या त्या दोघांना कार्यकारी अभियंता पदी बढती मिळ्णार आहे. परंतु त्या दोघांना काही करुन ते सध्या कार्यरत आहेत. तेथेच थांबायचे असून त्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु झाले असून राजकीय वजन वापरले जात असल्याची चर्चा सुरु आहे. तत्कालीन प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील याच्या काळातील पदोन्नतीचे प्रकरण गाजले होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले होते. त्या चौकशीचे पुढे काहीही झाले नाही. तत्कालीन उपायुक्तांनी अटी शर्थी डावलून जम्पींग पदोन्नती दिल्याने त्यावरुन वाद झाला होता. तसेच त्यात आर्थिक घोडे बाजार झाल्याची चर्चा रंगली होती. नाशिक महापालिकेचे सहा ठिकाणी विभागीय कार्यालये असून त्यातील दोन वेगवेगळ्या विभागीय कार्यालयातील दोघे उप अभियंते यांना कार्यकारीचे गिफ्ट मिळ्णार आहे. परंतु पदोन्नती ही घ्यायची आणि जुने ठिकाण सोडायचे नाही. दरम्यान महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून पदोन्नती देताना ती कशी असेल, आणि कोणाला कुठे बसवले जाइल, कोणता विभाग देण्यात येइल. हे समजणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी